तुम्ही पोस्टपेड वापरकर्ते असाल आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांसाठी लाभ देणारा प्लॅन शोधत असाल, तर या लेखात आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी AIRTEL आपल्या पोस्टपेड ग्राहकांना अशाच प्रकारचे प्लॅन ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 1499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो तुमच्यासाठी सर्वात स्वस्त असणार आहे. या प्लॅनमध्ये 5 वापरकर्ते एकाच वेळी लाभ घेऊ शकतात.
हे सुद्धा वाचा : OnePlus TV 65 Q2 Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…
AIRTELच्या 1499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये दरमहा 200GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंगसाठी अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. तर, दररोज 100 SMS दिले जातात. हा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन Netflix स्टँडर्ड मासिक सदस्यता, 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम सदस्यत्व, Disney + Hotstar Mobile आणि Wynk प्रीमियम सदस्यता 1 वर्षासाठी ऑफर करतो.
एअरटेलच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये 4 कनेक्शन मोफत जोडले जाऊ शकतात, ज्यासाठी मोफत कॉलिंग आणि 30GB पर्यंत डेटा दिला जातो. तर, जास्तीत जास्त 9 ऍड-ऑन कनेक्शन उपलब्ध आहेत. मोफत मर्यादेनंतर, प्रति कनेक्शन 299 रुपये शुल्क भरावे लागेल. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, इंटरनेटसाठी 2 पैसे प्रति MB शुल्क भरावे लागेल.
तसेच, SMS मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर, प्रति SMS 10 पैसे आकारले जातात. रोमिंग शुल्क लोकलसाठी 25 पैसे आणि STD साठी 38 पैसे आहे. 150 रुपये प्रति महिना शुल्क भरून ग्राहक नेटफ्लिक्स प्रीमियममध्ये अपग्रेड करू शकतात. एअरटेलच्या या प्लॅनची किंमत 1499 रुपये आहे, GST नंतर किंमत जास्त असेल.