Airtel च्या ‘या’ Best प्लॅनमध्ये 20 पेक्षा जास्त OTT चे मोफत सबस्क्रिप्शन, किंमत 400 रुपयांपेक्षा कमी। Tech News

Updated on 12-Jul-2024
HIGHLIGHTS

Airtel अनेक OTT सबस्क्रिप्शनसह अनेक प्लॅन्स ऑफर करते.

या श्रेणीत Airtel चा सर्वात स्वस्त 148 रुपयांचा प्लॅन आहे.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

Airtel आपल्या वापरकर्त्यांना अनेक अप्रतिम बेनिफिट्ससह प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी अमर्यादित कॉलिंग तसेच मोफत SMS आणि दैनिक डेटा ऑफर करते. याशिवाय आजकाल OTT चे वाढते ट्रेंड बघता कंपनीचे अनेक प्लॅन्स Netflix आणि Prime सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सदस्यता देखील देतात. काही प्लॅन्समध्ये कंपनी 20 पेक्षा जास्त OTT चे सबस्क्रिप्शन ऑफर करते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घेऊयात बेस्ट प्लॅन्सची यादी-

आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel अनेक एंटरटेनमेंट प्लॅनसह येते. यामध्ये सर्वात स्वस्त प्लॅनची ​​किंमत 148 रुपये आहे. तर, सर्वात महाग प्लॅन 1,499 रुपये आहे, ज्यामध्ये Netflix सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

airtel ott plans

Airtel च्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळतात अनेक OTT सबस्क्रिप्शन

Airtel 148 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये कंपनी 15GB डेटा ऑफर करते. या प्लॅनची वैधता तुमच्या ऍक्टिव्ह बेस प्लॅनच्या वैधतेसारखीच असणार आहे. हा प्लॅन Airtel XStream Play सह येतो. या प्लॅनमध्ये Sony Liv, Eros Now सारख्या 15 हून अधिक ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. मात्र, यामध्ये कॉलिंग आणि मोफत SMS सारखे फायदे मिळत नाही.

Airtel 359 रुपयांचा प्लॅन

359 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2.5 डेटा ऑफर करते. यासोबतच, या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह मोफत SMS देखील उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel च्या या पॅकमध्ये Airtel XStream Play चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. या अंतर्गत वापरकर्ते 20 पेक्षा जास्त OTT चे लाभ घेऊ शकतात.

Airtel 399 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये Airtel XStream Play चा ॲक्सेस देखील दिला जातो. या प्लॅनअंतर्गत 20 पेक्षा जास्त OTT चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. डेटाच्या गरजेसाठी प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो. त्याबरोरबच, या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 मोफत SMS देखील देते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :