Netflix सब्स्क्रिप्शन महाग आहेत? Airtel च्या ‘या’ अप्रतिम प्लॅन्ससह मिळेल मोफत सदस्यता
लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix सह Airtel प्लॅन्स
Airtel कडे Netflix सबस्क्रिप्शनसह प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत.
Netflix सबस्क्रिप्शनसह तुम्हाला या प्लॅन्ससह Amazon Prime Video, आणि Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध
Airtel Netflix Plan: सध्या तरुणाईमध्ये OTT प्लॅटफॉर्मची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे प्लॅटफॉर्म खास सिनेरसिकांसाठी तयार करण्यात आले आहेत. याद्वारे त्यांना विविध प्रकारचे चित्रपट, टीव्ही शो, डॉक्युमेंट्री आणि ओरीजनल कंटेंट थेट त्यांच्या डिव्हाइसवर स्ट्रीम करण्याची परवानगी मिळते. सध्या भारतात OTT प्लॅटफॉर्म्समध्ये Netflix चे वर्चस्व आहे.
Also Read: WhatsApp Dailer: नंबर सेव्ह न करता थेट ऍपद्वारेच कॉल करा, नव्या फिचरद्वारे अगदी सोपे होणार काम
जरी नेटफ्लिक्स भारतीय युजरसाठी आवडते आणि भरपूर संख्येने सदस्य असलेले प्लॅटफॉर्म असेल तरीही सबस्क्रिप्शन प्लॅन्सची किंमत अनेक युजर्ससाठी महाग आहे. जर तुम्हाला देखील Netflix चे सबस्क्रिप्शन मोफत मिळवाययचे असेल तर, हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे. होय, Airtel कडे Netflix सबस्क्रिप्शनसह काही निवडक प्लॅन्स उपलब्ध आहेत.
Airtel चा 1,499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Airtel च्या 1,499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन अंतर्गत, तुम्हाला 3GB दैनिक डेटासह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. हा प्लॅन Netflix बेसिक प्लॅनसह येतो. याचाच अर्थ नेटफ्लिक्स अकाउंट एका डिव्हाइसवर लॉग इन केले जाऊ शकते. तसेच, नेटफ्लिक्समधील कंटेंट 720p वर पाहिले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, Disney + Hotstar आणि Prime Video चे सबस्क्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.
Airtel चा 1,199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Airtel चा आणखी एक 1,199 रुपयांचा प्लॅन Netflix च्या सबस्क्रिप्शनसह येतो. मात्र, हा कंपनीचा पोस्टपेड प्लॅन होय. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. तर, डेटा रोलओव्हर बेनिफिटसह 150GB डेटा प्रदान केला जाईल. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन Netflix, Amazon Prime Video, आणि Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile