Airtel कडे तुमच्यासाठी उत्तम मनोरंजन प्रीपेड प्लॅन्स आहेत.
वापरकर्त्यांना Disney Plus Hotstar यासह अनेक OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
Airtel प्लॅन्ससह तुम्ही अनेक लोकप्रिय शोजचा आनंद घेऊ शकता.
Airtel कडे अनेक असे अनेक प्लॅन्स आहेत, जे तुम्हाला भरपूर डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत OTT सबस्क्रिप्शन बेनिफिट्ससह येतात. तुम्हाला हवे असल्यास Airtel कडे तुमच्यासाठी उत्तम मनोरंजन प्रीपेड प्लॅन्स आहेत. त्यांच्या स्वस्त प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी वापरकर्त्यांना Disney Plus Hotstar यासह अनेक OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहेत. चला बघुयात यादी-
Airtel चा 148 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 15GB डेटा दिला जातो. विशेष म्हणजे हा एक एन्टरटेंमेंट प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॉलिंगची सुविधा मिळणार नाही. हा प्लॅन 15 पेक्षा जास्त OTT ॲप्सच्या सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनमध्ये Sony Liv, Lionsgate Play, Eros Now, Hoichoi, ManoramaMax आणि Airtel Extreme Play चे मोफत सबस्क्रिप्शन 30 दिवसांच्या वैधतेसह दिले जाते.
Airtel चा 359 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये मासिक वैधता दिली जाते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB दैनंदिन डेटा, मोफत अमर्यादित व्हॉइस, 100 SMS/दिवस मिळणार आहेत. इतर बेनिफिट्समध्ये Wynk Music सह Airtel Extreme ॲपचा ऍक्सेस देखील तुम्हाला मिळेल.
Airtel चा 399 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांच्या वैधतेसह मिळणार आहे. त्याबरोबरच, दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100SMS देखील मिळतात.
Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन
या रिचार्जमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा, 100SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. विशेष म्हणजे Disney + Hotstar मोबाइलचे सब्स्क्रिप्शन दिले जाते. यासह तुम्ही अनेक लोकप्रिय टीव्ही शोज आणि सिरीजचा आनंद घेऊ शकता. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.