Disney + Hotstar चे मोफत सब्स्क्रिप्शन मिळवा, डेटा आणि कॉलिंगसह अप्रतिम Airtel प्लॅन्स

Disney + Hotstar चे मोफत सब्स्क्रिप्शन मिळवा, डेटा आणि कॉलिंगसह अप्रतिम Airtel प्लॅन्स
HIGHLIGHTS

Disney + Hotstar चे सब्स्क्रिप्शनसह Airtel प्लॅन्स

तीन महिन्यांच्या वैधतेसह OTT लाभ मिळणार आहे.

यासह डेटा, कॉलिंग आणि 5G सुविधा देखील मिळणार आहे.

टेलिकॉम कंपन्यानी सिनेरसिकांच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या प्लॅन्समध्ये OTT सब्स्क्रिप्शनचे बेनिफिट जोडले आहेत. AIRTEL कंपनी तुम्हाला Disney + Hotstar चे सब्स्क्रिप्शन काही प्लॅन्ससह मोफत देत आहे. एवढेच नाही तर प्लॅन्समध्ये इतरही बरेच महत्त्वाचे बेनिफिट्स उपलब्ध आहेत. सध्या Airtel आपल्या दोन प्लॅन्समध्ये तीन महिन्यांच्या वैधतेसह या OTT प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन मोफत देत आहे. 

AIRTEL चा 499 रुपयांचा प्लॅन

Airtel चा हा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 3GB डेटा आणि 100SMS मिळतात. यासोबतच प्लॅनमध्ये पात्र ग्राहकांसाठी 5G अमर्यादित डेटा देखील उपलब्ध आहे. विशेषतः या रिचार्ज प्लॅनसोबत  Disney + Hotstar चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जात आहे.

 याव्यतिरिक्त, इतर फायद्यांबद्दल बोलायचे झल्यास, या प्लॅनमध्ये Airtel Extreme, Wynk Music, मोफत Hello Tune, Apollo 24|7 सर्कल मेंबरशिप आणि FASTag रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.

AIRTEL चा 839 रुपयांचा प्लॅन

हा कंपनीचा प्रीमियम प्लॅन आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळतो. तसेच अमर्यादित कॉलिंगची सुविधाही आणि दररोज 100SMS दिली जात आहे. याशिवाय, Disney+Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅन 3 महिन्यांच्या वैधतेसह मोफत मिळणार आहे.  यासोबतच, प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यून इ. सारखे फायदेही दिले जात आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo