Cricket World Cup चे सामने तुम्ही Disney+Hotstar वर बघू शकता.
सुरुवातीच्या प्लॅनची किंमत 499 रुपये इतकी आहे.
इतर श्रेणींमध्ये देखील Disney+Hotstar चे सब्स्क्रिप्शन उपलब्ध आहे.
Disney+Hotstar हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. प्लॅटफॉर्मवर ग्राहक विश्वचषक 2023 आणि इतर अनेक लाईव्ह स्पोर्ट्सचे हिंदी, तामिळ आणि तेलगू यांसारख्या स्थानिक भारतीय भाषांमधील चित्रपट आणि कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात. तुम्हाला Cricket World Cup सामना टीव्ही किंवा मोबाइलवर थेट पाहायचा असेल, तर तुम्ही Disney+Hotstar वर बघू शकता . हे लक्षात घेऊन, आज आम्ही तुम्हाला Airtel च्या प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, ज्यासोबत तुम्हाला Disney+Hotstar चे सब्स्क्रिप्शन अगदी मोफत मिळेल.
Airtelचा 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:
Airtel च्या 499 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 वर्षाची Disney + Hotstar चे सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. त्याबरोबरच, प्लॅनमध्ये 3GB डेटा प्रतिदिन, मोफत कॉलिंग, 100 आउटगोइंग SMSचे फायदे मिळतील. प्लॅनमध्ये एकूण 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
Airtel चा 839 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100 SMS, प्राइम व्हिडिओ मोबाइल व्हर्जन फ्री टेस्टिंग मेंबरशिप आणि Airtel Appsसह 3 महिन्यांचे Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळेल. त्याबरोबरच, हा प्लॅन एकूण 56 दिवसांच्या वैधतेसह येतो.
Airtel चा 3,359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:
या प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या वैधतेसह Disney+Hotstar मोबाईल सब्सक्रिप्शन मिळेल. त्याबरोबरच, प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा प्रतिदिन, मोफत व्हॉईस कॉल्स, प्रतिदिन 100 SMS उपलब्ध आहेत. 1 वर्षाची प्राइम व्हिडिओ मोबाईल व्हर्जन फ्री ट्रायल मेंबरशिप आणि Airtel ऍप्स ऑफर आहेत. या प्लॅनची वैधता एकूण 365 दिवसांची आहे.
Disney+Hotstar सबस्क्रिप्शन काही पोस्टपेड म्हणजेच 499 रुपये, 599 रुपये आणि 999 रुपये या प्लॅनसह देखील मोफतमध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, तुम्ही 999 रुपये, 1,498 रुपये आणि 3,999 रुपयांच्या Airtel ब्रॉडबँड प्लॅनसह देखील Disney Plus Hotstarची मोफत सदस्यता उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.