टेलिकॉम दिग्गज भारती Airtel कडे प्रत्येक श्रेणीतील युजर्ससाठी अगदी परवडणारे प्लॅन्स आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel ने आपल्या वार्षिक प्रीपेड प्लॅन्समध्ये काही बेनिफिट्स समाविष्ट केले आहेत. विशेषत: 3 महिन्यांसाठी प्लॅन शोधत असलेल्या अशा वापरकर्त्यांना ते आवडेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, 84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. पुढील प्लॅन्समध्ये तुम्हाला 5G डेटाची सुविधा देखील मिळणार आहे. पाहुयात यादी-
Airtel चा हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, 6GB डेटा आणि 100SMS चे बेनिफिट मिळणार आहे. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन Apollo 24|7 सर्कल मेंबरशिपसह येतो.
Airtel च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रति महिना 286 रुपयांचा खर्च आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100SMS आणि दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. हा प्लॅन थोडा महाग आहे. पण वरील प्लॅनपेक्षा या प्लॅनमध्ये फायदे देखील जबरदस्त देण्यात आले आहेत.
Airtel च्या 979 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा दिला जातो. तसेच, हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये सुद्धा तुम्हाला समान कॉलिंग आणि SMS बेनिफिट्स मिळतात. जर तुम्ही हा प्लॅन खरेदी केला तर, त्यावर तुम्हाला 326 रुपये प्रति महिना खर्च मिळणार आहे.
Airtel चा 1029 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला जवळपास तीन महिन्यांची म्हणजेच 84 दिवसांची वैधता मिळते. म्हणेजच या प्लॅनमध्ये दरमहा 343 रुपयांचा खर्च आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड 5G डेटा आणि दररोज 2GB डेटाचा लाभ उपलब्ध आहे. त्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होतो.