Airtel देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज म्हणून प्रसिद्ध आहे. Airtel आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त पासून ते महागड्या आणि कमी वैधतेपासून ते दीर्घकाळ वैधतेसह येणारे प्लॅन्स ऑफर करते. एवढेच नाही तर, OTT चे वाढते क्रेझ बघता, AIRTEL ने आपल्या प्लॅन्समध्ये निरनिराळे OTT सब्स्क्रिप्शन देखील उपलब्ध करून दिले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला जवळपास दोन महिन्यांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. बघुयात यादी-
Airtel कडे 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्जमध्ये दररोज 1.5GB डेटा, मोफत व्हॉईस कॉलिंग आणि 100SMS दररोज मिळतात. तसेच, यात विंक म्युझिक, अपोलो 24/7 सर्कल आणि हॅलोट्यून्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
हा प्लॅनदेखील 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉल्स, दररोज 100 SMS आणि Xstream मोबाइल पॅकची मोफत सदस्यता देखील मिळेल. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळतो.
या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, 1.5GB दैनिक डेटा आणि दररोज 100 SMS मिळणार आहेत. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास Wynk Music सबस्क्रिप्शन, मोफत HelloTunes, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि Apollo 24/7 सर्कल सबस्क्रिप्शन यांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 60 दिवसांची वैधता मिळेल.
Airtel चा 699 रुपयांचा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लॅन दररोज 100 SMS, मोफत व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 2GB इंटरनेट डेटा ऑफर करतो. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये OTT सब्स्क्रिप्शन देखील दिले जाणार आहे. होय, तुम्हाला मनोरंजनासाठी या प्लॅनसह Amazon प्राइम मेंबरशिप मिळणार आहे.