Bharti Airtel ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करते. दरम्यान नवीन अहवालावर विश्वास ठेवला तर, Airtel 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढवू शकते. त्यामुळे या महागाईचा फटका तुम्हाला टाळायचा असेल, तर Airtel वार्षिक रिचार्ज प्लॅन्स खरेदी करू शकता. जाणून घेऊयात सर्व प्लॅन्स-
हे सुद्धा वाचा: Vi Movies & TV ॲपमध्ये 13+ OTT ॲप्स आणि 400+ Live टीव्हीचा आनंद घ्या, जाणून घ्या किंमत। Tech News
Airtel चा दीर्घकालीन रिचार्ज प्लॅन 365 दिवसांची वैधता देतो. याशिवाय, रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल, 3,600 SMS आणि 24GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमधील अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Wynk म्युझिक सबस्क्रिप्शन, मोफत HelloTunes, Apollo 24×7 Circle आणि FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक यांचा समावेश आहे.
Airtel चा 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन संपूर्ण 1 वर्षासाठी 2GB दैनिक डेटा, मोफत व्हॉईस कॉल्स, प्रतिदिन 100 SMS या सुविधेसह येतो. एवढेच नाही तर, तुम्हाला या प्लॅनमध्ये Wynk Music, Apollo 24×7 Circle, Fastag वर कॅशबॅक आणि मोफत HelloTunes यासारख्या इतर बेनिफिट्स देखील मिळणार आहेत.
हा या यादीतील सर्वात महागडा प्लॅन आहे. हा प्लॅनदेखील 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5 GB डेटा मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100SMS देखील मिळतात.तर, यात Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसह 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. त्याबरोरबच, युजर्सना Wynk Musc ॲप्सचे सदस्यत्व देखील दिले जाईल.