संपूर्ण 365 दिवसांच्या वैधतेसह येतात ‘हे’ Airtel प्लॅन्स, Unlimited 5G डेटा आणि OTT सह मिळतील आकर्षक बेनिफिट्स। Tech News

Updated on 04-Jan-2024
HIGHLIGHTS

Airtel युजर्ससाठी संपूर्ण वर्षाच्या वैधतेसह येणारे प्रीपेड प्लॅन्स

प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा कॉलिंगसह अनेक आकर्षक लाभ मिळतात.

Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील 1 वर्षासाठी उपलब्ध

अनेकदा लोक मासिक रिचार्ज करतात पण दर महिन्याला रिचार्ज करणे एखाद्या वैतागापेक्षा कमी नाही. जर तुम्ही Airtel युजर असाल आणि सतत मासिक रिचार्ज करून वैतागला असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. होय, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Airtel च्या वार्षिक प्लॅनबद्दल सांगणार आहोत. तुम्ही जर 2024 मध्ये रिचार्ज केले तर तुम्हाला पुढील रिचार्ज 2025 मध्येच करावे लागेल. एवढेच नाही तर, पात्र वापरकर्त्यांना Unlimited 5G डेटा सुद्धा वापरता येईल. चला तर मग Airtel च्या वार्षिक रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: JIO च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो मोफत इंटरनेट कॉल ऑप्शन, एका नंबरसह 3 नंबर मिळतील Free। Tech News

Airtel चा 1,799 रुपयांचा प्लॅन

Airtel चा दीर्घकालीन रिचार्ज प्लॅन 365 दिवसांची वैधता देतो. याशिवाय रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल, 3,600 SMS उपलब्ध आहेत. डेटा वापरासाठी तुम्हाला एकूण 24GB डेटा मिळणार आहे. रिचार्जवरील अतिरिक्त फायद्यांमध्ये Wynk म्युझिक सबस्क्रिप्शन, मोफत HelloTunes, Apollo 24×7 Circle आणि FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.

AIRTEL PLANS

Airtel चा 2,999 रुपयांचा प्लॅन

या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी दररोज 2GB डेटा मिळेल. तसेच, यामध्ये मोफत व्हॉईस कॉल, प्रति दिन 100 SMS ची सुविधा देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात Wynk Music, Apollo 24×7 Circle, Fastag वर कॅशबॅक आणि मोफत HelloTunes यासारख्या फायदे मिळतील.

Airtel चा 3,359 रुपयांचा प्लॅन

365 दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5 GB डेटा मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100SMS मिळतील. या प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. प्लॅनसह तुम्हाला Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मिळणार आहे. त्याबरोबरच, Wynk Musc Apps चे सदस्यत्व देखील दिले जाते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :