900GB पेक्षा जास्त डेटासह OTT सब्स्क्रिप्शन मोफत, बघा Airtel चे वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स

900GB पेक्षा जास्त डेटासह OTT सब्स्क्रिप्शन मोफत, बघा Airtel चे वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स
HIGHLIGHTS

वर्षभराच्या वैधतेसह येणारे AIRTELचे खास प्लॅन्स

या प्लॅन्सची सुरुवातीची किंमत 1,799 रुपये

प्लॅनमध्ये 912.5 GB 4G डेटा उपलब्ध आहे.

Airtel कडे 3 प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत ज्यांची वैधता 365 दिवस म्हणजे 1 वर्ष आहे. एअरटेलचे हे वार्षिक प्रीपेड प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉल, डेटा आणि OTT सदस्यता यासारख्या सुविधा देतात. जाणून घेऊयात एअरटेलच्या या तीन प्लॅनबद्दल सविस्तर माहिती…

हे सुद्धा वाचा : जगातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Amazonवर खरेदीसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

1,799 रुपयांचा Airtel प्लॅन

एअरटेलच्या 1,799 रुपयांच्या एअरटेल प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण 24 GB डेटा देण्यात आला आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक देशभरात अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात. 

2,999 रुपयांचा Airtel प्लॅन

Airtel च्या 2,999 रुपयांच्या एअरटेल प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. म्हणजेच, कंपनी ग्राहकांना एकूण 730 GB डेटा ऑफर करते. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सची सुविधाही देण्यात आली आहे. म्हणजेच, कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता, तुम्हाला देशभरात अमर्यादित व्हॉईस कॉल, STD आणि रोमिंग कॉलचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना DISNEY + HOTSTAR सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत मिळेल.

3359 रुपयांचा Airtel प्लॅन

Airtel च्या 3359 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची म्हणजेच एक वर्षाची आहे. या प्लानमध्ये दररोज 2.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहक एकूण 912.5 GB 4G डेटा वापरू शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि SMS ही मोफत आहेत. देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस, STD आणि रोमिंग कॉल मोफत आहेत.  या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना DISNEY + HOTSTAR सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत मिळेल. 

मात्र, हे लक्षात घ्या की Airtelच्या या सर्व रिचार्ज प्लॅनमध्ये, Apollo 24|7 सर्कलचा लाभ 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय FasTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, मोफत हेलोट्यून्स आणि विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन यांसारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo