AIRTEL ग्राहकांच्या खिशावर परत ताण येणार आहे. कारण कंपनीने रिचार्ज प्लॅन महागणार असल्याची घोषणा केली आहे. AIRTEL चे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितले की, एअरटेल यावर्षी सर्व प्लॅनचे दर वाढविण्याचा विचार करत आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. अलीकडेच कंपनीने 19 सर्कलमध्ये आपल्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत वाढवली आहे.
हे सुद्धा वाचा : ग्राहकांची मजा ! Xiaomi 13 Pro येताच Xiaomi 12 Pro ची किंमत 10,000 रुपयांनी कमी
खरं तर, नुकताच Airtel ने 99 रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे आणि आता मूळ किंमत 155 रुपयांवर आणली आहे, जी पूर्वीपेक्षा 57% जास्त आहे.
मित्तल म्हणाले की, कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे बॅलेन्स शीट मजबूत झाला आहे. परंतु दूरसंचार उद्योगातील गुंतवणुकीवरील परतावा खूपच कमी आहे आणि हे बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे, आम्ही प्लॅन्सचे दर थोड्या प्रमाणात वाढवणार आहोत. मात्र, किमती किती आणि कधी वाढवण्यात येतील, याबाबत अद्याप काही माहिती दिलेली नाही.
''आम्हाला देशात एक मजबूत टेलिकॉम कंपनी हवी आहे. भारताचे स्वप्न डिजिटल आहे, आर्थिक विकास पूर्णत: साकार झाला आहे. मला वाटते की सरकार पूर्णपणे सतर्क आहे आणि लोकही खूप सतर्क आहेत''. PTI च्या अहवालात असे म्हटले आहे की, दरवाढीमुळे काही ग्राहकांच्या खिशाला फटका बसेल या मतावर मित्तल यांचे मत भिन्न आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीला प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 300 रुपयांपर्यंत वाढवायचा आहे आणि टॅरिफ वाढवल्याने टेल्कोला भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स JIO ला आव्हान देण्यात मदत होईल.