1GB दैनिक डेटासह Airtel प्रीपेड प्लॅन्स, किंमत 181 रुपयांपासून सुरू

Updated on 23-Jan-2023
HIGHLIGHTS

Airtel कडे दररोज 1GB डेटासह येणारे अनेक प्लॅन्स आहेत.

या प्लॅन्सची किंमत रु. 181 पासून सुरू होते.

हे सर्व प्लॅन्स 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे आहेत.

Airtel ही भारतातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. आजकाल युजर्स अशा रिचार्ज प्लॅन्सच्या शोधात आहेत, ज्यामध्ये त्यांना अमर्यादित कॉलिंग, मोफत SMS आणि रोजचा डेटा मिळतो.

हे सुद्धा वाचा : Vivo Y55s 5G स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत

आज आम्‍ही तुम्‍हाला 1GB डेली डेटा लिमिटसह प्‍लॅन सांगणार आहोत. सर्व प्लॅन्सच्या किंमती आणि त्यामध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सची तुलना करून तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पॅक निवडण्यास सक्षम असाल. चला, जाणून घेऊया…

181 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन 181 रुपयांचा आहे. यामध्ये, 1GB डेटा संपूर्ण 30 दिवसांसाठी म्हणजे एक महिना दररोज उपलब्ध आहे. मात्र, यात याशिवाय इतर कोणत्याही लाभाचा समावेश नाही.

209 रुपयांचा प्लॅन

Airtel 209 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1GB दैनिक डेटा देखील देते. यासोबतच यूजर्सना दररोज 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. यामध्ये मोफत HelloTunes आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

239 रुपयांचा प्लॅन

कंपनी 239 रुपयांचा प्लॅन ऑफर करते. हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS सह 1GB दैनिक डेटा देखील देतो. या प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे.

265 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 265 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 1GB दैनिक डेटा दिला जातो. याशिवाय या पॅकमध्ये दररोज 100 मोफत SMS आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधाही मिळते. इतकंच नाही तर यात मोफत HelloTunes, Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :