Airtel प्लॅनची किंमत 1799, 2999 आणि 3359 रुपये आहे.
प्लॅन्समध्ये विशेषतः ग्राहकांना Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल.
हे लॉन्ग टर्म प्लॅन्स संपूर्ण एक वर्षांच्या वैधतेसह येतात.
प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel कडे दीर्घकालीन वैधतेसह अनेक प्लॅन्स आहेत. जर तुम्ही देखील Airtelचे ग्राहक असाल आणि दर महिन्याला रिचार्ज करून वैतागला आहात तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. Airtel कडे तीन प्रीपेड प्लॅन्स आहे, जे दीर्घकालीन वैधता आणि अप्रतिम बेनिफिट्ससह येतात. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सुविधांचा लाभ मिळेल. बघा यादी-
Airtel चा 1,799 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 24GB इंटरनेट डेटा, अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स आणि 3600 SMS ची सुविधा मिळणार आहे. अर्थातच हा प्लॅन संपूर्ण 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, तुम्हाला या प्लॅनमध्ये अपोलो 24|7 सर्कल, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचा फ्री ऍक्सेस देखील दिला जाईल.
Airtel चा 2,999 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये युजर्सना 365 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन सुविधा देते. एवढेच नाही तर, पात्र वापरकर्ते या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील घेऊ शकतात. वरील प्लॅनप्रमाणे, यामध्ये देखील तुम्हाला Apollo 24|7 Circle, मोफत HelloTunes आणि Wynk Music चे सदस्यत्व मिळणार आहे.
Airtel चा 3,359 रुपयांचा प्लॅन
हा या यादीतील शेवटचा लॉन्ग-टर्म प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, 365 दिवसांची वैधता आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळेल. या प्लॅनचे विशेष फिचर म्हणजे ग्राहकांना Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल. तर, Apollo 24|7 Circle, मोफत HelloTunes आणि Wynk Music चे ऍक्सेस देखील उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.