Airtel Plans List: संपूर्ण एका महिन्याच्या वैधतेसह येणारे अप्रतिम प्लॅन्स, भरपूर डेटासह Unlimited कॉलिंग आणि बरेच काही

Updated on 30-Oct-2023
HIGHLIGHTS

Airtel चे हे प्लॅन्स 30 दिवस आणि एका महिन्याच्या वैधतेसह येतात.

एकूण 50GB डेटा 489 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध

प्लॅन्समध्ये Wynk Music सह Airtel Extreme ऍपचा ऍक्सेस मिळतो.

Airtel ग्राहकांसाठी आम्ही सध्या भारतात उपलब्ध व्हॉइस आणि डेटा बेनिफिट्ससह Airtel च्या नवीन रिचार्ज प्लॅनची ​​यादी तयार केली आहे. हे प्लॅन्स 30 दिवस आणि एका महिन्याच्या वैधतेसह येतात. यामध्ये तुम्हाला भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर बरेच महत्त्वाचे फीचर्स मिळणार आहेत. चला तर मग बघुयात अप्रतिम प्लॅन्सची यादी.

30 दिवसांसाठी Airtel नवीन प्रीपेड प्लॅन

Airtelचा 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन्स 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एकूण 3GB इंटरनेट डेटा देखील येतो. याशिवाय रिचार्जमध्ये दररोज 100 SMS मिळतात. एकदा या प्लॅनमधील डेटा मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना 50p/MB शुल्क आकारले जाईल. यासह, विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

Airtelचा 296 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉल, 25GB डेटा, 100 दैनिक SMS आणि मोफत व्हॉईस कॉलिंगचा लाभ दिला जात आहे. त्यात, विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, फ्री हॅलोट्यून्स, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांचे Apollo सबस्क्रिप्शन दिले जाते.

Airtelचा 489 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 50GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS आणि मोफत व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, फ्री हॅलोट्यून्स, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांचे Apollo सबस्क्रिप्शन दिले आहे.

एका महिन्याच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स

Airtel चा 319 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एका महिन्याच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्समध्ये दर महिन्याला त्याच तारखेला रिचार्ज करावा लागेल, ज्या दिवशी पूर्वी रिचार्ज केला होता. हा प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉल, 2GB डेटा प्रतिदिन, 100 SMS/दिवस आणि Wynk Music आणि बरेच काही ऑफर करतो.

Airtel चा 359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

प्लॅनमध्ये 2GB दैनिक डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 SMS/दिवस, आणि मासिक वैधतेसह Wynk Music सह Airtel Extreme ऍपचा ऍक्सेस मिळतो. जर तुम्हाला जास्त डेटाची आवश्यकता असेल तर, हा प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

Airtel चा 509 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एका महिन्याच्या वैधतेसह Airtel चा हा सर्वात महागडा रिचार्ज आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 60GB डेटा, एक महिना वैधता, मोफत लोकल आणि STD व्हॉईस कॉल आणि डेली 100 SMS मिळतात. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त बेनिफिट्सही उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :