Airtel चा 912 GB डेटा प्लॅन बघितलं ? वर्षभराच्या वैधतेसह मिळेल अमर्यादित कॉल्स, मोफत हॉटस्टार सब्स्क्रिप्शन

Updated on 04-Jul-2022
HIGHLIGHTS

AIRTELचा वार्षिक रिचार्ज प्लॅन

प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा मिळेल

त्याबरोबरच, वर्षाभरासाठी 499 रुपयांचे Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत

Airtel ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स Jio नंतर, Airtelही एकमेव अशी कंपनीआ हे, ज्याचा युजर बेस देशात सर्वात मोठा आहे. भारती एअरटेलकडे अनेक वेगवेगळ्या रेंजमध्ये रिचार्ज प्लॅन आहेत. प्रीपेड, पोस्टपेड व्यतिरिक्त, एअरटेलकडे आंतरराष्ट्रीय प्लॅन्स देखील आहेत. एअरटेलकडे वार्षिक प्रीपेड प्लॅन्स देखील आहेत. आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत 3,359 रुपये आहे. हा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! 50MP कॅमेरा असलेल्या Redmi फोनवर मिळतेय प्रचंड सवलत, YouTube Premium देखील मोफत

Airtel चा 3,359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Airtel च्या 3,359 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एकदा रिचार्ज केल्यास तुम्हाला या कामापासून वर्षभराची सुट्टी मिळेल, म्हणजेच पुन्हा पुन्हा रिचार्ज संपण्याचे टेन्शन नसेल. या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहक एकूण 912.5 GB डेटा वापरू शकतात. दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत घसरतो.

याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्सही उपलब्ध आहेत. म्हणजेच ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित स्थानिक आणि STD कॉल करू शकतात. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS मिळतील.

याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये ग्राहकांना 1 वर्षासाठी 499 रुपयांचे Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. याशिवाय, अपोलो, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक सेवा देखील मोफत दिल्या जातात. FASTag घेतल्यावर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :