भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Airtel च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटासोबत अनेक बेनिफिट्स दिले जातात. एवढेच नाही तर, आपल्या प्रीपेड प्लॅनसह वापरकर्त्यांना OTT चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. कंपनीच्या प्लॅनमध्ये Netflix, Disney + Hotstar आणि Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
या रिपोर्टमध्ये आज आम्ही तुम्हाला Airtel च्या अशा प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामध्ये यूजर्स फक्त एक किंवा दोन नव्हे तर 22 पेक्षा जास्त OTT सबस्क्रिप्शनचे लाभ घेऊ शकतात. एवढेच नाही तर, सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, या प्लॅन्समध्ये दैनंदिन डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि SMS इ. उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
Airtel चा कथित प्रीपेड प्लॅन 28 दिवसांसाठी म्हणजे सुमारे एक महिन्यासाठी वैधतेसह येतो. कथित Airtel प्लॅनची किंमत 449 रुपये इतकी आहे. जाणून घेऊयात संपूर्ण बेनिफिट्स-
Airtel च्या 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3GB मोबाईल डेटा दिला जातो. प्लॅनमधील इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि दररोज 100SMS देखील दिले जात आहेत. महत्त्वाचे लक्षात घ्या की, 3GB दैनिक डेटासोबत या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील उपलब्ध आहे. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.
याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Airtel xStream Play Premium चे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. या सबस्क्रिप्शन अंतर्गत वापरकर्त्यांना 22 पेक्षा जास्त OTT चा 28 दिवसांसाठी पूर्ण ऍक्सेस मिळतो. सविस्तर बोलायचे झाल्यास, यामध्ये Sony LIV, SunNxt, Aha, Lionsgate Play, Chaupal इ. समाविष्ट आहेत. लक्षात घ्या की, Airtel xStream ॲप डाउनलोड करून वापरकर्ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.