Airtel Accidental Insurance: युजर्ससाठी Good News! ‘या’ जबरदस्त प्लॅनसह मिळेल तब्बल 5 लाखांपर्यंतचा विमा
Airtel काही रिचार्ज प्लॅन अंतर्गत Accidental Insurance ऑफर करते.
Airtel सिम असल्यास कंपनी तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत कमाल कव्हर देईल.
Airtel आपल्या विद्यमान 3 प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह हा लाभ देत आहे.
भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Airtel आपल्या फास्ट इंटरनेट स्पीड देण्यासाठी प्रसिद्ध आहे. Airtel च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. यासह कंपनी नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लॅन्स ऑफर करत असते. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक उपयुक्त फायदे मिळणार आहे.
होय, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला कंपनीच्या आकर्षक बेनिफिट्सबद्दल माहिती देणार आहोत. Airtel कंपनी आपल्या ग्राहकांना काही रिचार्ज प्लॅन अंतर्गत Accidental Insurance देखील ऑफर करते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या बेनिफिटसाठी कंपनीने ICICI लोम्बार्डसोबत पार्टनरशिप केली आहे. तुम्ही जर Airtel चे ग्राहक असाल तर तुम्हीही या उत्तम ऑफरचा लाभ घेऊ शकता.
Airtel Accidental Insurance
तुमच्याकडे 1 पेक्षा जास्त Airtel सिम असल्यास कंपनी तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत कमाल कव्हर देईल. याशिवाय, या बेनिफिटसाठी तुमचे वय 18 ते 80 च्या दरम्यान असणे, आवश्यक आहे. पॉलिसी कालावधी दरम्यान तुम्ही या विम्यावर तीन वेळा क्लेम करू शकता.
Airtel Accidental Insurance प्लॅन्स
अहवालानुसार, Airtel कंपनी ICICI Lombard सह भागीदारी अंतर्गत Accidental Insurance म्हणेजच अपघाती विमा ऑफर करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी आपल्या विद्यमान 3 प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह हा लाभ देत आहे. या प्लॅन्सची किंमत 239 रुपये, 399 रुपये आणि 969 रुपये इतकी आहे.
239 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, दररोज 100SMS आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. हा प्लॅन ICICI Lombard अंतर्गत वापरकर्त्यांना अपघाती विमा प्रदान करतो. या योजनेअंतर्गत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये आणि रुग्णालयात दाखल झाल्यास 25,000 रुपये दिले जातील. ही प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, परंतु हे विमा संरक्षण 30 दिवसांसाठी वैध राहील.
399 रुपयांचा प्लॅन: Airtel च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 2GB डेटा आणि 100SMS प्रतिदिन मिळतात. प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसाठी आहे. अपघाती विमा मृत्यू किंवा अपंगत्वासाठी 1 लाख रुपये देते. अपघातामुळे रुग्णालयात दाखल झाल्यास वापरकर्त्यांना 30 दिवसांसाठी 25,000 रुपये मिळतील.
969 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळते. अपघाती विम्याचे फायदेही सारखेच आहेत. तसेच, विमा फायदे वरील प्लॅन्सप्रमाणे आहेत. अपघाती विमा मृत्यू किंवा अपंगत्वासाठी 1 लाख रुपये देते. अपघातामुळे रुग्णालयात दाखल झाल्यास 90 दिवसांसाठी वापरकर्त्यांना 25,000 रुपये मिळतील. प्लॅन्स खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile