एयरटेल ने आपल्या एंट्री लेवल पोस्टपेड प्लान मध्ये काही महत्वपूर्ण बदल करता या प्लान मध्ये तुम्हाला जास्त डेटा ऑफर करण्याची घोषणा केली आहे.
एयरटेल ने आपल्या एंट्री लेवल पोस्टपेड प्लान मध्ये काही महत्वपूर्ण बदल करता या प्लान मध्ये तुम्हाला जास्त डेटा ऑफर करण्याची घोषणा केली आहे. कंपनी च्या Rs 399 वाल्या इनफिनिटी पोस्टपेड प्लान मध्ये आता 20GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे.
पण हे अजून स्पष्ट झाले नाही की कंपनी कडून हा डेटा दर माह मिळणार आहे की एका वर्षासाठी मिळणार आहे, परंतु जर हा डेटा तुम्हाला दर माह या हिशोबाने मिळणार असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला या प्लान मध्ये 40GB डेटा मिळेल. पण जर हा डेटा एका वर्षासाठी मिळणार असेल तर तुम्हाला 20GB दर माह डेटा मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, हा डेटा तुम्हाला एका वर्षासाठी मिळत आहे. याचा अर्थ असा की या प्लान मध्ये तुम्हाला 20GB डेटा दर माह आणि 20GB डेटा एका वर्षासाठी मिळत आहे.
या प्लान मध्ये तुम्हाला डेटा रोलऑवर ची सुविधा पण मिळते. याचा अर्थ असा की या प्लान मध्ये तुम्ही 500GB डेटा स्टोर करू शकता. त्याचबरोबर यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS प्रति दिन मिळत आहेत. यात कॉलिंग साठी कोणतीही FUP लिमिट नाही. पण या प्लान मध्ये तुम्हाला इतर इनफिनिटी प्लान्स प्रमाणे अमेजॉन प्राइम चे सब्सक्रिप्शन मिळत नाही.