Airtel Broadband Plans: एयरटेल आपल्या यूजर्सना देत आहे 1000GB डेटा, बघा कोण आहेत हे यूजर्स

Airtel Broadband Plans: एयरटेल आपल्या यूजर्सना देत आहे 1000GB डेटा, बघा कोण आहेत हे यूजर्स
HIGHLIGHTS

Airtel Broadband Plans: एयरटेल ने त्यांच्या Rs 799 आणि त्यावरील प्लान्सच्या (ब्रॉडबैंड) सेट यूजर्सना 1000GB बोनस डेटा देत आहे. विशेष म्हणजे कंपनी ने आपल्या वार्षिक आणि सहामाही प्लान्स सोबत हा डेटा सादर केला आहे.

नुकतेच तुम्ही ऐकले असेल की ACT Fibernet ने आपल्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या होत्या. असे बोलले जात आहे की एयरटेल आणि जियोला मागे टाकण्यासाठी कंपनी ने असे पाऊल टाकले आहे. आता एयरटेल कडून पण असेच पाऊल उचलले गेले आहे. कारण कंपनी ने अपने ब्रॉडबँड प्लान्स सोबत आपल्या यूजर्सना बोनस डेटा देणार असल्याचे समोर आले आहे. कंपनी ने आपल्या वार्षिक आणि सहामाही प्लान्स सोबत आपल्या यूजर्सना 1000GB डेटा देणार आहे. ही ऑफर 31 मार्च, 2019 पर्यंत वैध आहे. 

तुम्हाला तर माहितीच आहे की एयरटेल च्या ब्रॉडबँड प्लान्सची सुरवाती किंमत Rs 499 आहे पण या प्लान सोबत तुम्हाला कोणताही बोनस डेटा मिळणार नाही. कंपनीचे काही मोठ्या प्लान्स जसे की Rs 799 मध्ये येणार्‍या प्लान मध्ये तुम्हाला 100GB डेटा मिळत आहे, तसेच एयरटेल कडून तुम्हाला या प्लान मध्ये 500GB बोनस डेटा पण दिला जात आहे. त्याचबरोबर कंपनी कडे एक Rs 999 मध्ये येणारा प्लान पण आहे, जो तुम्हाला जवळपास 250GB डेटा ऑफर करतो, या प्लान मध्ये तुम्हाला एयरटेल कडून 1000GB बोनस डेटा पण दिला जात आहे. 

त्याचबरोबर एयरटेल च्या Rs 1,299 मध्ये येणार्‍या प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला जवळपास 500GB डेटा मिळत आहे, सोबत कंपनी कडून तुम्हाला 1000GB डेटा पण बोनस म्हणून दिला जात आहे. याव्यतिरिक्त पण एयरटेल कडे अजून एक प्लान आहे, जो Rs 1,999 मध्ये येतो. या प्लान मध्ये तुम्हाला 1000GB बोनस डेटा एयरटेल कडून दिला जात आहे. विशेष म्हणजे एयरटेल च्या Rs 999, Rs 1,299 आणि Rs 1,999 मध्ये येणार्‍या प्लान सोबत नेटफ्लिक्स आणि अमेजॉन प्राइम चे सब्सक्रिप्शन पण मिळत आहे. 
 

नोट: डिजिट मराठी आता टेलीग्राम वर पण उपलब्ध आहे, दिवसभरातील टेक संबंधित ताज्या बातम्यांसाठी आम्हाला Telegram वर पण सब्सक्राइब करा!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo