Vodafone प्रमाणेच आता Airtel ने पण सुरु केली रोमिंग मध्ये VoLTE सेवा

Vodafone प्रमाणेच आता Airtel ने पण सुरु केली रोमिंग मध्ये VoLTE सेवा
HIGHLIGHTS

विशेष म्हणजे भारती एयरटेल कडे देशात जवळपास 22 टेलीकॉम सर्कल्स आहेत, त्यातील 21 मध्ये तुम्हाला VoLTE सेवा मिळत आहे, पण जम्मू आणि कश्मीर मध्ये सध्यातरी हि सेवा तुम्हाला मिळत नाही.

भारतात आपली VoLTE सेवा सुरु करून भारती एयरटेल ला जवळपास दोन वर्षे झाली आहेत, तरी होम सर्कल मध्ये तुम्हाला या सेवेचा लाभ अजूनपर्यंत मिळत नव्हता. आता झालेल्या लेटेस्ट अपग्रेड मध्ये तुम्हाला हि सेवा मिळायला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे एयरटेल ने आता रोमिंग मध्ये पण VoLTE सेवा सुरु केली आहे. सोप्प्या शब्दांत सांगायचे तर तुम्ही रोमिंग मध्ये जाऊनही HD वॉयस कॉलचा आनंद घेऊ शकता.

उदाहरणार्थ तुम्ही जर तुम्ही आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सर्कल मध्ये VoLTE इनेबल्ड हॅन्डसेट वापरत असाल तर तुम्ही या सेवेचा लाभ दिल्ली मध्ये पण तसाच घेऊ शकता, जसे तुम्हाला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे एयरटेलचे भारतात जवळपास 22 टेलीकॉम सर्कल आहेत, पण एयरटेलची पोच किंवा असे म्हणूया कि एयरटेल या सेवेच्या बाबतीत 21 मधेच सक्रीय स्वरूपात काम करत आहे, एक सर्कल म्हणजे जम्मू आणि कश्मीर अजूनही या सेवेपासून वंचित आहे. वोडाफोन आधीपासूनच असे काहीसे करत आहे.

अलीकडेच एयरटेल ने एक नवीन ऑफर लॉन्च केली होती, ज्यात तुम्हाला Rs 70 मध्ये खूप काही मिळत होते. एयरटेल च्या या नवीन रिचार्ज प्लान नुसार जर तुम्ही त्यांच्या 70 रुपयांच्या प्लानने रिचार्ज केला तर तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल. सोबत 100MB 2G/3G/4G डेटा पण यात दिला जात आहे. तसेच तुम्हाला कॉलिंगची सुविधा पण दिली जात आहे. युजर्स साठी या प्लानबद्दल एक खास बाब अशी पण आहे कि एयरटेल ने हा प्लान आपल्या सर्व युजर्ससाठी आणला नाही तर नवीनयुजर्ससाठी हा प्लान उपलब्ध आहे.

हा प्लान त्या युजर्ससाठी आहे जे एयरटेलचे नवीन ग्राहक बनतील. त्यामुळे जे नवीन युजर्स एयरटेलचा भाग बनू इच्छित आहेत ते या प्लानचा सहज फायदा घेऊ शकतात. कंपनी ने अशाप्रकारचा प्लान आपल्या युजर्सची संख्या वाढवण्याची आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी आणला आहे. त्यामुळे हा एयरटेल चा नवीन आणि आकर्षक प्लान Jio ला चांगली टक्कर देऊ शकतो.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo