Bharti एयरटेल त्या यूजर्स साठी एक नवीन स्कीम घेऊन आली आहे, ज्यातून 4G वर अपग्रेड करणार्या यूजर्सना 30GB डेटा मोफत मध्ये ऑफर करत आहे. या स्कीम अंतर्गत जे एयरटेल यूजर्स 2G/3G मोबाइल डिवाइस वर 4G वर अपग्रेड करत आहेत त्यांना 30GB डेटा मोफत मिळेल. प्रीपेड यूजर्सना 1GB डेटा प्रतिदिन या हिशोबाने 30 दिवसांपर्यंत मिळणार आहे. तर पोस्टपेड यूजर्सना त्यांच्या पहिल्या बिलींग साइकल मध्ये हा डेटा एक साथ मिळेल. विशेष म्हणजे जर तुम्ही हा डेटा वापरला नाही तर हा पुढील महिन्यात फॉरवर्ड होईल.
आपल्या या ऑफर ची माहिती कंपनी एका टीवी कमर्शियल च्या माध्यमातून देत आहे, ही जाहिरात तुम्ही पण तुमच्या टीवी वर बघू शकता. पण हा फ्री मिळण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील. याचा अर्थ असा की हा डेटा मिळविण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला हा डेटा मिळणार आहे की नाही ते.
हा डेटा तुम्हाला मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्या प्रीपेड किंवा पोस्टपेड फोन वरून एक टोल फ्री नंबर म्हणजे 51111 वर कॉल करावा लागेल, किंवा तुम्ही माय एयरटेल अॅप वर जाऊन पण ही माहिती जाणून घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही हा डेटा क्लेम केला तर तुम्हाला हा डेटा फक्त 24 तासांच्या आत तुमच्या फोन वर मिळेल.
कंपनी चे म्हणणे आहे की ही स्कीम कंपनी च्या मेरा 'पहला स्मार्टफोन' मोहिमे अंतर्गत येते. या मोहिमेअंतर्गत एयरटेल ने अनेक मोबाईल कंपन्यांशी हात मिळवणी केली आहे. ही कंपनी 4G स्मार्टफोन्सची एक अफोर्डेबल एकोसिस्टम बनवणार आहे.
ज्या कंपन्यांशी एयरटेल ने हात मिळवणी केली आहे, त्यात सॅमसंग, इंटेक्स, कार्बन, लावा, सेल्कन, मोटोरोला, लेनोवो, नोकिया, आयटेल, जेन, आणि लीफोन आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एयरटेल ने एक कॅशबॅक प्रोग्राम ची पण सुरवात केली होती, ज्या माध्यमातून काही निवडक स्मार्टफोन्स जसे की नोकिया इत्यादी सोबत तुम्हाला Rs 2,000 चा कॅशबॅक पण दिला जात आहे.