Airtel New Plans: आता येईल खरी मजा! कंपनीने T20 World Cup लाँच केले नवे प्लॅन्स, वाचा डिटेल्स। Tech News 

Airtel New Plans: आता येईल खरी मजा! कंपनीने T20 World Cup लाँच केले नवे प्लॅन्स, वाचा डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

Airtel ने ICC T20 World Cup 2024 दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी नवे प्लॅन्स लाँच केले.

Airtel ने नवे प्रीपेड, पोस्टपेड आणि होम इंटरनेट रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे प्लॅन Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतात.

Airtel ने ICC T20 World Cup 2024 दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी खास नवे प्लॅन्स डिझाईन केले आहेत. होय, कंपनीने नवे प्रीपेड, पोस्टपेड आणि होम इंटरनेट रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. Airtel च्या या नवीन रिचार्ज प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतात. हे OTT प्लॅटफॉर्म भारतातील स्पर्धेसाठी अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार आहे. बघुयात सर्व तपशील-

Also Read: Jio च्या ‘या’ प्लॅनसह T20 Cricket World Cup सामन्यांचा आनंद घ्या, फोनवर चालेल LIVE स्ट्रीमिंग

Airtel चे नवे प्रीपेड प्लॅन्स

499 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 499 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांसाठी दररोज 3GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो. यासह, ग्राहकांना तीन महिन्यांचे Disney+Hotstar सबस्क्रिप्शन देखील मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, वापरकर्त्यांना Airtel Xstream Play वर 20 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म, अमर्यादित लोकल आणि STD कॉल्स मिळतील. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात Apollo 24|7 आणि Fastag सारख्या सुविधा मिळतील.

Airtel Most Affordable Data Voucher

869 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 869 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तीन महिन्यांचे Disney + Hotstar सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. वरील प्लॅनप्रमाणे, यामध्ये देखील Airtel Extreme Play द्वारे अनेक OTT ॲप्सचे ऍक्सेस मिळेल. तसेच, तुम्हाला अमर्यादित लोकल आणि STD कॉल्स मिळतील. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अपोलो 24|7 आणि फास्टॅगची सुविधा मिळणार आहे.

3,359 रुपयांचा प्लॅन

Airtel ने हा प्लॅन दीर्घकालीन वापरकर्त्यांसाठी बनवलेला आहे. या प्लॅनची वैधता संपूर्ण वर्षभरासाठी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2.5GB दैनिक डेटा, एक वर्षासाठी Disney+Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात Xstreme ॲपवर निवडक OTT प्लॅटफॉर्मवर ऍक्सेस मिळेल. या प्लॅनसह देखील अमर्यादित कॉल, Apollo 24|7 आणि फास्टॅग सर्व्हिसचा समावेश आहे.

Disney Plus hotstar
Disney Plus hotstar

Airtel चे नवे पोस्टपेड प्लॅन्स

Airtel च्या नव्या पोस्टपेड प्लॅन्सची किंमत 499, 599 रुपये इतकी आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये एकूण 75GB डेटा, Disney+Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शनचे एक वर्षासाठी मिळेल. तर, Xstreme प्लेसाठी तीन महिने मोफत ऍक्सेस मिळेल.

याव्यतिरिक्त, 999, 1199, 1499 रुपयांचे प्लॅन्स देखील सादर करण्यात आले आहेत. हे प्लॅन अनुक्रमे 100GB, 150GB आणि 200GB डेटासह येतात. त्याबरोरबच, यासह तुम्हाला Disney+ Hotstar Mobile चे मोफत वार्षिक सदस्यत्व आणि अमर्यादित XstremePlay ॲक्सेस देखील मिळेल. याशिवाय, तुम्हाला या प्लॅन्समध्ये अमर्यादित 5G डेटा आणि फॅमिली ॲड-ऑन फायदे देखील मिळतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo