टेलिकॉम दिग्गज Airtelने यूजर्ससाठी नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. कंपनीचा हा प्लॅन 199 रुपयांचा आहे. यामध्ये 30 दिवसांची वैधता दिली जात आहे. एअरटेल आधीदेखील वापरकर्त्यांना 199 रुपयांचा प्लॅन ऑफर करत असे. जुन्या प्लॅनची 24 दिवसांची वैधता मिळायची, तर 199 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅनची सेवा 30 दिवसांची वैधता आहे. नवीन आणि जुन्या प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या डेटामध्येही फरक आहे. आधीच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये, कंपनी 24 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1GB डेटा ऑफर करत होती, जी नंतर 1.5GB पर्यंत वाढवण्यात आली.
हे सुद्धा वाचा : इंस्टाग्राम युजर्सची मज्जाच मजा ! कंटेंट शेड्युलिंग टूल जारी, जाणून घ्या आणखी काय आहे खास…
नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवस इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 3 GB डेटा मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला 1MB डेटासाठी 50 पैसे खर्च करावे लागतील. नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये एकूण 300 मोफत SMS देत आहे. प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये विनामूल्य HelloTunes आणि विंक म्युझिकची मोफत सब्स्क्रिप्शन समाविष्ट आहे.
कंपनी 296 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देखील देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत SMS देखील मिळतील. इंटरनेट वापरण्यासाठी या प्लॅनमध्ये एकूण 25 GB डेटा दिला जात आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला 1MB डेटासाठी 50 पैसे खर्च करावे लागतील. FASTag च्या खरेदीवर कंपनी या प्लॅनच्या ग्राहकांना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. याशिवाय तुम्हाला या प्लॅनमध्येही मोफत विंक म्युझिक आणि हॅलोट्यून्सचाही लाभ मिळेल.