प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी भारती Airtel कंपनी आपल्या महागड्या रिचार्जसाठी ओळखली जाते. मात्र, कंपनीकडे अनेक परवडणारे प्लॅन्स देखील आहेत. कंपनी वेळोवेळी असे अनेक प्लॅन्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करत असते. आता कंपनीने आपल्या डेटा पॅक सेक्शनमध्ये एक नवीन स्वस्त प्लॅन समाविष्ट केला आहे. या प्लॅनची किंमत अवघ्या 30 रुपयांपेक्षा कमी आहे. केवळ नवीन पॅकच नाही तर कंपनीने सध्याच्या डेटा पॅकमध्येही काही बदल केले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Airtel च्या नव्या प्लॅनमधील बेनिफिट्स-
भारती Airtel ने आपल्या डेटा पॅक पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन समाविष्ट केला आहे. या प्लॅनची किंमत फक्त 26 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Airtel चा हा डेटा पॅक वापरकर्त्यांना 1.5GB डेटा सुविधा देतो. लक्षात घ्या की, या प्लॅनची वैधता फक्त 1 दिवसापर्यंत आहे. तसेच, डेटा कोटा संपल्यानंतर, प्रति एमबी 50 पैसे शुल्क आकारले जाईल.
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने सध्याच्या पुढील प्लॅन्समध्ये बदल केले आहेत.
Airtel चा 22 रुपयांचा प्लॅन: Airtel डेटा पॅकची किंमत आधी 19 रुपये होती, हा प्लॅन आता 22 रुपयांना रिचार्ज करता येईल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सना 1GB डेटाची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची देखील 1 दिवसाच्या वैधतेसह येतो.
Airtel चा 33 रुपयांचा प्लॅन: कंपनीकडे 33 रुपयांचा डेटा पॅक देखील आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 2GB डेटाची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये 1 दिवसाची वैधता देखील देण्यात आली आहे.
121 रुपयांचा प्लॅन: यापूर्वी या प्लॅनची किंमत 98 रुपये होती. मात्र, आता हा प्लॅन 121 रुपयांना रिचार्ज करता येईल. हा प्लॅन तुम्हाला 6GB डेटाची सुविधा देतो. या प्लॅनची वैधता तुमच्या बेस प्लॅनइतकी आहे.