Airtel 451 Recharge Plan Explained
Airtel New Plan: भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज Airtel ने OTT लव्हर्स आणि मोठ्या प्रमाणात इंटरनेटची गरज असणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40GB पेक्षा जास्त हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. मनोरंजनासाठी, या प्लॅनमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. मात्र, या प्लॅनमध्ये इतर महत्त्वाचे टेलिकॉम बेनिफिट्स मिळणार की नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Airtel च्या नव्या प्लॅनची किंमत-
Airtel च्या कथित नवीन प्लॅनची किंमत 451 रुपये आहे. हा Airtel चा नवीन डेटा व्हाउचर प्लॅन आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 30 दिवस म्हणजेच 1 महिन्याची वैधता दिली जात आहे. या कालावधीत इंटरनेट वापरासाठी एकूण 50GB डेटा उपलब्ध असेल.
वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. होय, या प्लॅनमध्ये तुम्हाला JioHotstar चे सबस्क्रिप्शन देखील 3 महिन्यांसाठी मोफत मिळणार आहे. अर्थातच, यासह वापरकर्ते ईपला सामन्यांसह नवीनतम वेब सिरीज आणि चित्रपट पाहू शकतील. मात्र, या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS सारखी सुविधा मिळणार नाही.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, टेलिकॉम कंपनी Airtel च्या नवीन डेटा व्हाउचरला सध्याच्या प्लॅनसह रिचार्ज करता येईल. हा डेटा प्लॅन अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ऍपवर उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर जाऊन हा प्लॅन रिचार्ज करता येतो.
Airtelने आपली पोहोच वाढवण्यासाठी किराणा मालाची प्रसिद्ध डिलिव्हरी साइट Blinkit शी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, वापरकर्ते आता त्यांच्या घरून Airtel चे सिम ऑर्डर करण्यास सक्षम असतील. युजर्सना हे सिम केवळ 10 मिनिटांत मिळणार आहे. यातील विशेष गोष्ट म्हणजे युजर्स ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सिम सक्रिय करू शकतील. लक्षात घ्या की, या सर्व्हिसची किंमत 49 रुपये इतकी असेल. महत्त्वाचे म्हणजे ही सेवा दिल्ली, मुंबईसह देशातील केवळ 16 शहरांमध्ये उपलब्ध आहे.