सध्या आता बरेच जण कामानिमित्त विमान प्रवास करत असतात. त्यामुळे आकाशातही तुम्हाला चांगल्या इंटरनेटची गरज भासणार आहे. तर, भारती Airtel ने तुमच्यासाठी काही नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅन्सच्या मदतीने Airtel युजर्स विमानातून प्रवास करतानाही इंटरनेट वापरू शकतील. हे प्लॅन्स देखील तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत आणले गेले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel चे इन-फ्लाइट रोमिंग प्लॅन 195 रुपयांपासून सुरू होतात.
या प्लॅनबद्दल माहिती देताना Airtel ने सांगितले की, कंपनीच्या या इन-फ्लाइट रोमिंग प्लॅन्सद्वारे वापरकर्ते जमिनीपासून हजारो फूट उंचीवर जाऊनही हायस्पीड इंटरनेट वापरू शकतील.
कंपनीने एकूण तीन नवीन इन-फ्लाइट रोमिंग प्लॅन सादर केले आहेत. हे प्लॅन्स 195 रुपये, 295 रुपये आणि 595 रुपयांचे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात सर्व प्लॅन्सचे बेनिफिट्स-
Airtel चा 195 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये 24 तास वैधतेसह 250MB डेटा, 100 मिनिटे आउटगोइंग कॉल आणि 100 आउटगोइंग SMS चा लाभ मिळतो.
Airtel चा 295 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये 24 तास वैधतेसह 500MB डेटा, 100 मिनिटे आउटगोइंग कॉल आणि 100 आउटगोइंग SMS ऑफर करतो.
Airtel चा 595 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये 24 तासांच्या वैधतेसह 1GB डेटा, 100 मिनिटे आउटगोइंग कॉल्स आणि 100 आउटगोइंग SMS ऑफर करतात.
लक्षात घ्या की, ग्राहकांनी 2,997 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणि 3,999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन किंवा त्याहून अधिक प्लॅनसाठी रिचार्ज केल्यास, त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय इन-फ्लाइट रोमिंग प्लॅनचे सर्व बेनिफिट्स आपोआप मिळतील.