भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज भारती Airtel कंपनीने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 3 नवीन डेटा व्हाउचर लाँच केले आहेत. कंपनीने तीन नवे प्लॅन्स 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केले आहेत. नव्या प्लॅन्सची किंमत 161 रुपये, 181 रुपये आणि 361 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक डेटा बेनिफिट्स मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला वैधतेची सुविधा देखील मिळेल, परंतु ती फक्त डेटा वैधता असणार आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Airtel च्या नवीन प्लॅन्स 161 रुपये, 181 रुपये आणि 361 रुपयांचे आहेत. हे प्लॅन्स तुम्हाला 30 दिवसांच्या वैधतेसह डेटा लाभ देतील. एवढेच नाही तर, तुम्हाला या प्लॅन्ससह वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता असेल. पाहुयात बेनिफिट्स-
Airtel च्या 161 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन संपूर्ण एक महिना म्हणेजच 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांच्या वैधतेसह 12GB डेटाची सुविधा मिळते. वर सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला या प्लॅन्ससह वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता असेल.
Airtel चा नवा 181 रुपयांचा प्लॅन एकूण 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लॅन तुम्हाला एकूण 15GB डेटाचा एक्सेस देईल. तुम्ही हा 15GB डेटा 30 दिवसांसाठी कधीही वापरू शकता. तसेच, या प्लॅनसह तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता आहे.
यादीतील शेवटच्या Airtel च्या नव्या 361 रुपयांच्या तिसऱ्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येईल. बेनिफिट्समध्ये, हा प्लॅन तुम्हाला एकाच वेळी 50GB डेटाचा एक्सेस देणार आहे. हा 50GB डेटा तुम्ही महिनाभर वापरू शकता. लक्षात घ्या, या प्लॅनसह देखील तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता असणार आहे.