Airtel ने लाँच केले आकर्षक प्रीपेड प्लॅन्स, अप्रतिम Unlimited बेनिफिट्ससह Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध। Tech News

Updated on 04-Dec-2023
HIGHLIGHTS

Airtel च्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 869 रुपये इतकी आहे.

या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि Unlimited 5G डेटादेखील उपलब्ध आहे.

या प्लॅनसह Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे.

Airtel ही देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या लक्षात आलेच असेल की, भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवण्यासाठी आणि अधिकाधिक वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी ते दररोज अधिक आणि आकर्षक बेनिफिट्ससह प्रीपेड प्लॅन्स लाँच करत आहे. दरम्यान, कंपनीने आता आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक रिचार्ज प्लॅन समाविष्ट केला आहे.

Airtel च्या नव्या प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही तर OTT बेनिफिट्सदेखील मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, Airtel च्या नवीन प्रीपेड प्लॅनची ​​किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

Airtel चा 869 रुपयांचा प्लॅन

होय, Airtel च्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 869 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळणार आहे. लक्षात घ्या की, दैनंदिन डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. एवढेच नाही तर, मनसोक्त कॉलिंग करण्यासाठी प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील दिली जाईल. यामुळे तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर तासन् तास बोलू शकाल. तसेच, दररोज 100SMS देखील यात मिळणार आहेत.

प्लॅनमध्ये उपलब्ध इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Airtel च्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये Unlimited 5G डेटा, Apollo 24|7 सर्कलचा ऍक्सेस देखील मिळेल. तसेच, रिवॉर्ड मिनी, फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. त्याबरोबरच, हा प्लॅनदेखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :