Airtel ने 4G रिचार्ज प्लॅन आणला असून मिळेल अमर्यादित कॉलिंगसह दररोज 1.5GB डेटा
स्वातंत्र्य दिनानिमित्त जवळपास प्रत्येक टेलिकॉम कंपनीने अनेक खास रिचार्ज प्लॅन आणले आहेत.
AIRTEL ने सुद्धा दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत
Airtel चे हे दोन प्लॅन 519 रुपये आणि 799 रुपयां चे आहेत.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जवळजवळ प्रत्येक टेलिकॉम कंपनीने अनेक खास रिचार्ज प्लॅन आणले आहेत. Airtel नेही असेच काहीसे केले आहे. JIO नंतर भारती AIRTELनेही दोन उत्तम प्रीपेड प्लॅन आणले आहेत. Airtel चे हे दोन प्लान 519 आणि 799 रुपयांचे आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 100 SMS आणि अमर्यादित व्हॉईस कॉलसह दररोज 1.5GB डेटा मिळतो.
हे सुद्धा वाचा : अप्रतिम युक्ती ! WhatsApp स्टेटस पहा आणि कुणाला माहीतही होणार नाही, जाणून घ्या ही खास युक्ती
AIRTELचा 519 रुपयांचा प्लॅन
Airtel ने 60 दिवसांसाठी नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 90GB डेटा मिळेल. जर तुम्ही डेटाचा पुरेपूर वापर करत असाल तर आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की, यानंतर इंटरनेटचा स्पीड 64Kbps होणार आहे. या प्लॅनद्वारे ग्राहकांना विंक म्युझिक, हॅलोट्यून्स, अपोलो 24*7 सर्कल विनामूल्य वापरण्याची संधी मिळेल. तसेच, तुम्हाला FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
AIRTEL चा 799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 135GB डेटा मिळेल. त्याबरोबरच, ग्राहकाला दररोज 1.5 GB डेटा मिळेल आणि दररोज 100 SMS पाठविण्याचा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलचा लाभ देखील मिळेल. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक विंक म्युझिक, अपोलो 24*7 सर्कल, हॅलोट्यून्समध्ये विनामूल्य प्रवेश करू शकतात. एवढेच नाही तर FASTag वर तुम्हाला 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
AIRTEL 5G सेवा
AIRTEL ने 5000 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. एअरटेल मार्च 2024 पर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करेल अशी अपेक्षा आहे. त्याबरोबरच, एअरटेल या वर्षाच्या अखेरीस अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. यापूर्वी या टेलिकॉम कंपनीने असे दोन उत्कृष्ट 4G प्लॅन आणले होते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile