Airtel ने आणला 35 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, बघुयात काय मिळेल खास ?

Updated on 13-Jan-2023
HIGHLIGHTS

Airtel चा 35 रुपयांचा प्लॅन दोन दिवसांच्या वैधतेसह येतो.

Airtel चा हा नवीन प्लॅन एक डेटा प्लॅन आहे.

कंपन्यांकडे असे इतरही प्लॅन्स उपलब्ध आहेत.

टेलिकॉम दिग्गज कंपनी Airtel कडे आपल्या यूजर्ससाठी अनेक प्लॅन आहेत. त्यामध्ये स्वस्त पासून ते जास्त किमतीत येणारे प्लॅन्स आहेत. आता कंपनीने प्रीपेड यूजर्ससाठी अतिशय स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची ​​किंमत फक्त 35 रुपये आहे. बघुयात या प्लॅनमध्ये तुम्हाला खास काय मिळणार आहे… 

हे सुद्धा वाचा : Tecno Phantom X2 Pro चे प्री-बुकिंग लवकरच होणार सुरु, तुम्ही आहात का 50 लकी ग्राहकांपैकी एक ?

Airtel चा 35 रुपयांचा प्लॅन

 Airtelचा हा प्लॅन सध्या कंपनीच्या अधिकृत साइटवर दिसत नाही. परंतु एका रिपोर्टनुसार, हा प्लॅन यूजर्सना कंपनीच्या मोबाइल ऍपवर दिसत आहे. मात्र, 35 रुपयांच्या या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त डेटा मिळेल, कारण 35 रुपयांमध्ये लाँच केलेला हा प्लॅन एक डेटा व्हाउचर आहे.

म्हणजेच या प्लॅनद्वारे तुमचा नंबर रिचार्ज केल्यास, तुम्हाला या प्लॅनमध्ये डेटाशिवाय कॉलिंग किंवा SMS ची सुविधा मिळणार नाही. तुमच्या सध्याच्या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपेल तेव्हाच हा प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या प्लॅनसह तुम्हाला 2 दिवसांची वैधता मिळेल, हा प्लॅन तुम्हाला 2 दिवसात एकूण 2 GB डेटा देईल.

19 रुपयांचा डेटा प्लॅन

दुसरीकडे, कंपनीकडे 19 रुपयांचा डेटा प्लॅन देखील आहे. एअरटेल 19 रुपयांच्या प्लॅन 1 दिवसाच्या वैधतेसह प्रीपेड वापरकर्त्यांना 1 GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो. 

35 रुपयांचा एअरटेल डेटा प्लॅन त्यांना आवडेल, ज्यांना 1 GB किंवा 3 GB डेटा ऐवजी 2 GB डेटा हवा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel च्या 3 GB डेटा प्लॅनची किंमत 58 रुपये आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :