टेलिकॉम मार्केटमध्ये Jio, VI आणि BSNL ला टक्कर देण्यासाठी Airtel ने नवीन प्रीपेड प्लॅन आणला आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांच्या गरजेनुसार हाय-स्पीड डेटा दिला जातो. हा नवीन प्लॅन अमर्यादित कॉलिंगसह उपलब्ध आहे. याशिवाय प्लॅनमध्ये लोकप्रिय OTT बेनिफिट्स देखील मिळतील. जे युजर्स सारखं रिचार्ज करायला कंटाळा करतात, त्यांच्यासाठी हा दीर्घकालीन प्लॅन उपयुक्त ठरेल. Airtel च्या नवीनतम रिचार्ज प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स बघुयात.
Airtel च्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा आणि 100SMS दिले जातील. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा प्लॅन OTT बेनिफिट्ससह येतो. होय, तुम्हाला प्लॅनमध्ये लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix चे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल, ज्याची वैधता तीन महिन्यांची आहे.
प्लॅनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अमर्यादित 5G डेटा, अपोलो 24|7 सर्कल, फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकमध्ये मोफत ऍक्सेस मिळेल. महत्त्वाचे म्हणजे हा प्लॅन देखील 84 दिवसांच्या म्हणजेच जवळपास तीन महिन्यांच्या वैधतेसह येतो.
तुम्ही Airtel च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ऍपला भेट देऊन नवीन प्रीपेड प्लॅन रिचार्ज करू शकता. यासह मिळणारा Netflix सब्स्क्रिप्शन क्लेम करण्यासाठी तुम्ही सर्व प्रथम प्रीपेड प्लॅन रिचार्ज करा. आता Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी Airtel Thank App वर जा. यानंतर डिस्कव्हर थँक्स बेनिफिट्स पेजवर जा आणि ‘Proceed’ बटणवर टॅप करा. या प्रक्रियेद्वारे तुमची सदस्यता सक्रिय केली जाईल.