जगभरात फिरणाऱ्या ग्राहकांसाठी Airtel ने लाँच केला नवा Affordable इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन, बघा बेनिफिट्स। Tech News 

जगभरात फिरणाऱ्या ग्राहकांसाठी Airtel ने लाँच केला नवा Affordable इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन, बघा बेनिफिट्स। Tech News 
HIGHLIGHTS

Airtel च्या नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकची किंमत 133 रुपये इतकी आहे.

Airtel चा हा प्लॅन 184 देशांमध्ये कव्हर केला जाईल.

Airtel च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना लोकल सिमकार्ड दिले जाईल.

भारतातील प्रसिद्ध दूरसंचार कंपनी Airtel केवळ चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठीच नाही तर आपल्या महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. कंपनीकडे युजरच्या गरजेनुसार अनेक प्लॅन्स आहेत. त्याबरोबरच, कंपनीने अनेक इंटरनॅशनल प्लॅनदेखील लाँच केले आहेत. दरम्यान, आता आपल्या युजर्ससाठी Airtel ने स्वस्त आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक लाँच केला आहे. होय, जे युजर्स वारंवार परदेशात जातात त्यांच्यासाठी हा पॅक सर्वोत्तम ठरेल.

लक्षात घ्या की, Airtel चा हा प्लॅन 183 देशांमध्ये कव्हर केला जाईल. याशिवाय, यामध्ये डेटा, इन-फ्लाइट Wi-Fi आणि कस्टमर सपोर्ट सारख्या सुविधा उपलब्ध असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

airtel best OTT recharge plans

Airtel चा 133 रुपयांचा इंटरनॅशनल प्लॅन

होय, एअरटेलच्या या नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकची किंमत 133 रुपये प्रतिदिन आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा नवीन 133 रुपयांच्या आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन 184 देशांमध्ये वैध असणार आहे.

Airtel च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना लोकल सिमकार्ड दिले जाईल. या सिममध्ये डेटा अलाउन्स, इन-फ्लाइट वाय-फाय आणि ग्राहक समर्थन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. सविस्तरपणे सांगायचे झाल्यास, Airtel तुम्हाला आंतरराष्ट्रीय सिम प्रदान करेल, ज्या देशात तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत आहात. तुम्ही Airtel Thanks ॲपद्वारे हा प्लॅन ऍक्टिव्ह करू शकता. त्याबरोबरच, तुम्ही airtel.in या साईटला भेट देऊनही हा प्लॅन खरेदी करू शकता.

Airtel चे इंटरनॅशनल रोमिंग पॅक

कंपनी आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये 649 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील सादर करते. हा एक आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक आहे, जो 1 दिवसाच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये यूजर्सना 500MB डेटा सुविधा मिळते. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये वापरकर्ते 100 मिनिटांचे कॉलिंग बेनिफिट आणि 10SMS ची सुविधा देखील मिळेल. हा प्लॅन अमेरिका, युरोप, आखाती, आशिया, आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये उपलब्ध आहे.

कंपनीने या लाईनअपमध्ये आणखी एक अप्रतिम प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 755 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1GB डेटाची सुविधा मिळेल. कंपनीचा हा प्लॅन अमेरिका, युरोप, आखाती, आशिया, आफ्रिका इ. देशांमध्ये उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo