Airtel ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे. जर तुम्ही Airtel यूजर असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची वैधता अगदी कमी किमतीत एक वर्षापर्यंत मिळणार आहे. तसेच, त्यात अनेक फायदे उपलब्ध आहेत…
हे सुद्धा वाचा : खुशखबर ! नव्या iPhone 14 ची किंमत iPhone 13 पेक्षा कमी असेल, 'या' रिपोर्टने केले दावा
Airtel युजर्सना 1799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. हा प्लॅन 365 दिवसांच्या सेवेच्या वैधतेसह येतो. यात ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 24GB डेटासह एकूण 3600 SMS ऑफर केले जातात. ऑफर केलेला डेटा एकरकमी स्वरूपाचा आहे. म्हणजेच तुम्हाला दररोज 2GB किंवा 3GB डेटापर्यंत मर्यादित राहण्याची गरज नाही.
मात्र, हा प्लॅन आणखी डेटा प्रदान करत नाही. तुम्ही एकदा 24GB डेटा वापरल्यानंतर, तुम्हाला मोबाइल डेटा वापरणे सुरू ठेवण्यासाठी Airtel च्या 4G डेटा व्हाउचरने रिचार्ज करावे लागेल. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी योग्य आहे ज्यांना जास्त डेटाची गरज नाही. जर तुम्ही बहुतेक घरातून किंवा ऑफिसमधून काम करत असाल जिथे तुम्हाला ब्रॉडबँड Wi-Fi सुविधा मिळतेय. तर तुमच्यासाठी हा प्लॅन उत्तम ठरू शकतो.
जे वृद्ध लोक जास्त डेटा वापरत नाहीत त्यांच्यासाठी देखील हे सर्वोत्तम आहे. म्हणजेच फक्त व्हॉट्सऍप वापरा आणि वर्षभर रिचार्ज करण्याचं टेन्शन देखील राहणार नाही. कंपनी या प्लॅनसह अतिरिक्त फायदे देखील देते. अपोलो 24/7 सर्कल, FASTag वर वापरकर्ते रु. 100 कॅशबॅक इ. बेनिफिट्स मिळवू शकतात. योजनेसह ऑफर केलेले 3600 SMS एकस्वरूपी येत नाहीत. वापरकर्ता एका दिवसात जास्तीत जास्त 100 SMS वापरण्यास सक्षम असेल.
जर तुम्ही दिवसानुसार नुसार पाहिले तर एका दिवसाची किंमत 4.9 रुपये होते. म्हणजेच, दररोज 5 रुपयांपेक्षा कमी खर्च केल्यास, तुम्ही डेटा, 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळवू शकता.