Airtel ने सादर केला अजून एक शानदार प्रीपेड प्लान, या यूजर्सना मिळेल सर्वात जास्त फायदा
एयरटेल ने Rs 249 च्या किंमतीत आपला नवीन प्लान सादर केला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला 2GB डेटा प्रतिदिन या हिशोबाने दिला जात आहे, त्याचबरोबर कंपनी ने आपल्या Rs 349 मध्ये येणार्या प्लान मध्ये काही बदल पण केले आहेत.
एयरटेल ने Rs 249 च्या किंमतीत आपला नवीन प्लान सादर केला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला 2GB डेटा प्रतिदिन या हिशोबाने दिला जात आहे, त्याचबरोबर कंपनी ने आपल्या Rs 349 मध्ये येणार्या प्लान मध्ये काही बदल पण केले आहेत. हा काही दिवसांमध्ये सादर करण्यात आलेला तिसरा प्लान आहे, याआधी कंपनीने आपला Rs 649 वाला पोस्टपेड प्लान सादर केला आहे, तसेच त्यांनी आपला एक नवीन प्लान फक्त Rs 499 च्या किंमतीत पण सादर केला आहे.
पण हा एक प्रीपेड प्लान आहे. या दोन प्लान्स नंतर आता कंपनी ने आपला एक नवीन प्लान पण सादर केला आहे, ज्याची किंमत फक्त Rs 249 आहे.
या प्लान बद्दल बोलायचे झाले तर सर्वात आधी हे लक्षात घ्या की हा की एक प्रीपेड प्लान आहे. या प्लान मध्ये तुम्हाला संपूर्ण 28 दिवसांसाठी 2GB डेटा प्रतिदिन च्या हिशोबाने मिळत आहे. या बरोबरच कंपनी च्या Rs 349 वाल्या प्लान मध्ये काही बदल समोर आले आहेत. या प्लान मध्ये आता पर्यंत फक्त 2.5GB डेटा मिळत होता, पण आता तुम्हाला या प्लान मध्ये 3GB डेटा मिळणार आहे. एयरटेल च्या या नव्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान ची सरळ टक्कर जियो च्या Rs 198 वाल्या प्लान शी आहे.
कदाचित तुम्ही हाच विचार करत असाल की तुम्हाला या प्लान मध्ये फक्त 2GB डेटा मिळणार आहे तर तसे नाही, या प्लान मध्ये तुम्हाला या डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग सोबत 100 SMS प्रतिदिन च्या हिशोबाने मिळणार आहेत. तसेच या प्लान ची वैधता 28 दिवस आहे.
त्याचप्रमाणे Rs 349 मध्ये येणार्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सह 100 SMS प्रतिदिन पण मिळत आहेत. तसेच यात कॉलिंग ची कोणतीही डेली किंवा साप्ताहिक लिमिट पण नाही.
जर एयरटेल चा दुसरा प्लान म्हणजे Rs 499 वाल्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर हा प्लान पण कंपनी ने काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला 82 दिवसांसाठी रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग ज्यात एक कॅच आहे. सोबतच यात तुम्हाला 100 SMS प्रतिदिन च्या हिशोबाने मिळणार आहे.