Reliance Jio Effect: एयरटेल ने 82 दिवसांच्या वैधते सह सादर केला 246GB डाटा देणारा दमदार प्लान
या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डाटा फक्त Rs 2.26 च्या किंमतीत मिळत आहे, त्याचबरोबर रोज 3GB डाटा तुम्ही या प्लान अंतर्गत वापरू शकता.
रिलायंस जियो आपल्या लॉन्च सोबत डाटा आणि कॉलिंग ची एक नवीन पर्वणी घेऊन आली होती, ज्यामुळे इतर टेलीकॉम कंपन्यांना त्रास झाला. विशेष म्हणजे म्हणजे त्यानंतर रिलायंस जियो ला अन्य कंपन्या कडून चांगली टक्कर मिळाली आहे. आता पण तसेच काही झाले आहे. भारती एयरटेल ने ही टक्कर चालू ठेवत आपला नवीन प्लान सादर केला आहे. या लढाईत कुठे ना कुठे तरी एयरटेल ला यश मिळाले आहे. कंपनी ने नवीन प्लान च्या रूपात Rs 558 च्या किंमतीत येणारा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. या प्लान मध्ये यूजर्सना खास ऑफर्स मिळत आहेत.
टेलीकॉम टॉक कडून समोर आलेल्या या बातमीनुसार कंपनी आपल्या या प्लान मध्ये 82 दिवसांच्या वैधते सह 3GB रोज 3G/4G डाटा देईल. याचा अर्थ असा की तुम्ही एका दिवसात 3GB डाटा संपवू शकता. त्याचबरोबर या संपूर्ण वैधते साठी तुम्हाला एकूण 246GB डाटा मिळत आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डाटा फक्त 2.26 च्या किंमतीत मिळत आहे. या प्लान मध्ये मिळणार्या डाटा व्यतिरिक्त तुम्हाला यात अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे, ज्यात कोणत्याही प्रकारची FUP लिमिट नाही. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला प्रतिदिन 100 SMS पण मिळत आहेत.
एयरटेल ने काही दिवसांपूर्वी आपल्या Rs 199 च्या वरील सर्व प्लान्स च्या FUP ला पुन्हा एकदा रिवाइज्ड केले होते. याचा अर्थ असा की 3GB ची लिमिट पूर्ण झाल्यावर तुमचा स्पीड कमी होऊन 128Kbps होईल. पण रिलायंस जियो बद्दल बोलायचे तर यात तुमचा स्पीड कमी होऊन 64Kbps केला आहे.
एयरटेल चा हा प्लान खुप चांगला आहे आणि याची सरळ टक्कर जियो च्या Rs 498 किंमतीत मिळणार्या प्लान सोबत होईल, या प्लान मध्ये कंपनी कडून 182GB डाटा 91 दिवसांसाठी तुम्हाला मिळत आहे, सोबत 2GB प्रतिदिन तुम्हाला वापरता येईल. त्याचबरोबर तुम्हाला जियो च्या सर्व प्लान्स सह रिलायंस जियो च्या अॅप्स चे सब्सक्रिप्शन फ्री मिळत आहे.