एयरटेलचे या तिन्ही नवीन प्रीपेड प्लान्सची वैधता 28 दिवस आहे आणि हे डेटा, टॉकटाइम आणि टॅरिफ बेनिफिट सोबत येतात.
एयरटेल ने आपल्या नवीन प्रीपेड प्लान्सची रेंज सादर केली आहे ज्या अंतर्गत एकाच प्लान मध्ये टॉकटाइम, 4G/3G डाटा आणि टॅरिफ बेनिफिट मिळतील. या पॅक्स ची ही खासियत आहे की यांसाठी यूजर्सना जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. कंपनी चे म्हणेन आहे की रिसर्च आणि ग्राहकांच्या फीडबॅक नंतर हे नवीन रिचार्ज पॅक्स सादर करण्यात आले आहेत. या प्लान्स मध्ये 35, 65 आणि 95 रुपयांच्या रिचार्ज चा समावेश आहे.
एयरटेल सुरवातीला हे पॅक्स तामिळनाडू, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये सादर करेल आणि त्यानंतर काही दिवसांनी देशातील इतर भागांत हे रिचार्ज पॅक्स सादर केले जातील. एयरटेलचा दावा आहे की हे प्लान्स डेटा, कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि SMS इत्यादी सह येतील.
एयरटेल चा नवीन 35 रुपयांचा कॉम्बो रिचार्ज या प्लान मध्ये 100MB 3G / 4G डेटा, 26.66 रुपयांचा टॉकटाइम, लोकल आणि STD कॉल्स 1 पैसा प्रति सेकंडचा टॅरिफ मिळेल आणि या प्लान ची वैधता 28 दिवस आहे.
एयरटेलचा नवीन 65 रुपयांचा कॉम्बो रिचार्ज या प्लान मध्ये 200MB डेटा, 65 रुपयांचा टॉकटाइम, लोकल आणि STD कॉल्स 1 पैसा प्रति सेकंडचा टॅरिफ मिळत आहे आणि या प्लानची वैधता पण 28 दिवस आहे.
एयरटेल चा नवीन 95 रुपयांचा कॉम्बो रिचार्ज 95 रुपयांच्या या नवीन प्लान मध्ये 500MB 3G / 4G डेटा, 95 रुपयांचा टॉक टाइम मिळेल. या प्लान मध्ये टॅरिफ रेट 1 पैसा प्रति 2 सेकंड होतो. या प्लानची वैधता पण 28 दिवस आहे.