जुलै महिन्याच्या सुरुवातीला इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांसह Airtel ने देखील त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमतीत वाढ केली. या दरवाढीचा प्रत्येकच ग्राहकाला मोठा फटका बसला. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांना दिलासा देत, आता Airtel ने आपले अमर्यादित 5G डेटा बूस्टर प्लॅन्स लाँच केले आहेत. कारण बूस्टर पॅकमुळे 1GB किंवा 1.5GB प्लॅनमध्येही 5G वापरता येतो. चला तर मग जाणून घेऊयात AIRTEL च्या नव्या डेटा बूस्टर प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती-
Airtel च्या नव्या अमर्यादित 5G बूस्टर पॅकची सुरुवातीची किंमत फक्त 51 रुपये इतकी आहे. यासोबतच, कंपनीने 101 आणि 151 रुपयांचे दोन इतर 5G बूस्टर पॅकदेखील लाँच केले आहेत. या तिन्ही नवीन डेटा बूस्टर प्लॅनसह ग्राहक प्रतिदिन 1GB किंवा प्रतिदिन 1.5GB डेटासह प्लॅनमध्ये अमर्यादित 5G वापरण्यास सक्षम असतील.
आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्राहक हे बूस्टर त्यांच्या विद्यमान डेटा पॅकमध्ये देखील सक्रिय करू शकतात. त्यानंतर, फोनमध्ये 5G तंत्रज्ञान वापरता येईल. एवढेच नाही तर, हे अपग्रेड प्लॅन ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा लाभांव्यतिरिक्त अतिरिक्त 3GB, 6GB आणि 9GB डेटा ऑफर करतात.
आत्तापर्यंत Airtel दररोज 2GB डेटा प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा देत होते. मात्र, नवीन अपग्रेडनंतर कंपनी 1GB आणि 1.5GB डेटामध्ये देखील ही 5G अमर्यादित डेटाची सुविधा मिळेल. तसेच, आता वापरकर्त्यांना दररोज 1GB आणि 1.5GB डेटा पॅकमध्ये देखील अमर्यादित 5G डेटाची सुविधा मिळेल.
Jio ने देखील 51,101 आणि 151 रुपयांचा प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन्स अमर्यादित 5G डेटासह येतात आणि तुमच्या विद्यमान सक्रिय प्लॅनच्या वैधतेशी जुळतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, अमर्यादित 5G 2GB दैनिक किंवा त्याहून अधिक डेटासह Jio रिचार्ज प्लॅन्सपर्यंत मर्यादित होते. मात्र, आता तुम्हाला या 3 नव्या डेटा प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा मिळेल. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.