Airtel ने प्रतिदिन 1.5GB डेटा सह सादर केला नवीन 398 रुपयांचा प्लान, 70 दिवसांच्या वैधते सह

Airtel ने प्रतिदिन 1.5GB डेटा सह सादर केला नवीन 398 रुपयांचा प्लान, 70 दिवसांच्या वैधते सह
HIGHLIGHTS

Bharti Airtel आपल्या Rs 398 वाले प्रीपेड प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 1.5GB डेटा देत आहे आणि याची वैधता 70 दिवस ठेवण्यात आली आहे.

महत्वाचे मुद्दे

  • प्रतिदिन मिळेल 1.5GB डेटा
  • नवीन प्लानची किंमत आहे Rs 398
  • Rs 399 वाले प्लान मध्ये पण केले आहेत बदल

Bharti Airtel नेहमीच आपल्या प्रीपेड सब्सक्राइबर्स साठी जुन्या प्लान्स मध्ये बदल करून नवीन ऑफर्स सादर करत असते. एयरटेल ने नवीन Rs 398 वाला प्रीपेड प्लान सादर केला आहे. कंपनीच्या 398 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये एयरटेल एकूण वैधतेसाठी 105GB डेटा ऑफर करत आहे आणि प्लानची वैधता 70 दिवस आहे. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स आणि फ्री SMS पण मिळतात. या प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 90 SMS मिळतात आणि एकूण कालावधी साठी हि संख्या 6300 वर जाते. तसेच कंपनीने आपल्या 399 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये पण बदल केले आहेत ज्यात आता 84 दिवसांसाठी प्रतिदिन 1GB डेटा मिळेल.

Airtel Rs 398

Airtel च्या Rs 398 च्या प्रीपेड रिचार्ज मध्ये यूजर्सना प्रतिदिन 1.5GB डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि प्रतिदिन 90 SMS मिळतील. रिलायंस जियो प्रमाणे एयरटेल पण अनलिमिटेड लोकल, STD आणि नॅशनल रोमिंग कॉल्स ऑफर करते आणि कॉल्स साठी कोणतीही लिमिट पण यात देण्यात आलेली नाही. Vodafone Idea प्रतिदिन यूजर्सना 250 मिनिटांची लिमिट देते आणि यूजर्स प्रति सप्ताह 1000 मिनिटांचा वापर करू शकतात तसेच संपूर्ण वैधता मध्ये यूजर्स फक्त 100 युनीक नंबर्स वरच कॉल करू शकतात.

एयरटेल Rs 399

एयरटेल आपल्या प्रीपेड यूजर्स साठी Rs 399 चा रिचार्ज पण ऑफर करत आहे ज्याची वैधता काही यूजर्स साठी 70 आणि काही साठी 84 दिवसांची आहे. या प्लान मध्ये आधी यूजर्सना प्रतिदिन 1.4GB डेटा मिळत होता जो आता कमी करून प्रतिदिन 1GB करण्यात आला आहे आणि सोबतच यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS पण मिळतात.

रिलायंस जियो

रिलायंस जियोच्या Rs 399 च्या प्रीपेड प्लान मध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS मिळतात. डेटा बेनिफीट पाहता हा प्लान प्रतिदिन 1.5GB डेटा ऑफर करतो आणि याची वैधता 84 दिवस आहे, म्हणजे एकूण वैधतेसाठी या प्लान मध्ये 126GB डेटा मिळतो. तसेच जियो ऍप्प्सचा फ्री ऍक्सेस पण मिळतो.

वोडाफोन

Vodafone चा हा प्लान पण 84 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड लोकल, STD, रोमिंग कॉलिंग सोबत प्रतिदिन 100 SMS मिळतात आणि युजर्स प्रतिदिन 1GB डेटा वापरू शकतात. तसेच यूजर्स Vodafone प्ले ऍप पण ऍक्सेस करू शकतात.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo