Airtel ने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी 395 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन आधी कंपनीने 56 दिवसांच्या वैधतेसह सादर केला होता. मात्र, आता कंपनीने लवकरच हा प्लॅन अपग्रेड केला आहे. कंपनीने या प्लॅनची वैधता वाढवली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, हा कंपनीचा अनलिमिटेड बेनिफिट्ससह येणारा प्लॅन आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त समाविष्ट झालेले फायदे-
वर सांगितल्याप्रमाणे, Airtel ने काही दिवसांपूर्वी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 395 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन समाविष्ट केला आहे. हा प्लॅन यापूर्वी 56 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला होता. मात्र, आता कंपनीने प्लॅन अपग्रेड केला आहे. लक्षात घ्या की, आता या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेऐवजी तुम्हाला 70 दिवसांची वैधता मिळेल. मात्र, या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स पूर्वीप्रमाणेच राहतील.
Airtel च्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 70 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळेल. तर, इंटरनेट वापरासाठी प्लॅनमध्ये 6GB डेटाही मिळतो. याशिवाय, या प्लॅन अंतर्गत तुम्हाला तब्बल 600 SMS देखील मोफत मिळतील. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes आणि Wynk Music बंडल ऑफर आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel प्रमाणे Jio च्या पोर्टफोलिओमध्ये देखील 395 रुपयांचा प्लॅन समाविष्ट आहे. मात्र, हा प्लॅन Airtel पेक्षा जास्त बेनिफिट देतो, असे दिसते. Jio कंपनी आपल्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देते. याशिवाय, या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास यात 6GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 1000 SMS मोफत मिळतील. तुम्ही जवळपास तीन महिन्यांपर्यंत या सुविधांचा लाभ घेऊ शकता.