गेल्या वर्षी टॅरिफ प्लॅन्सचे दर वाढल्यानंतर ग्राहक स्वस्त रिचार्ज प्लॅन्सच्या शोधात आहेत. त्यानंतर आता फारच कमी प्लॅन शिल्लक आहेत, जे 100 रुपयांपेक्षा कमी रकमेत डेटा, कॉल, SMS या सर्वांचा लाभ देतात. या कारणामुळे युजर्सना रिचार्जसाठी वाजवीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. जर तुम्ही स्वस्त रिचार्जमध्ये अधिक फायदे शोधत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला Airtel, Jio आणि BSNL च्या 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत…
रिलायन्स जिओच्या बहुतेक प्लॅन्स तसे महागडे आहेत. 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या Jio प्लॅनबद्दल बोलायचे तर, कंपनी 91 रुपयांचा प्लॅन ऑफर करते. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. तसेच, यात वापरकर्त्यांना एकूण 3GB डेटा मिळतो. ज्यामध्ये वापरकर्त्यांना दररोज 100MB डेटा आणि 200MB अतिरिक्त डेटा मिळतो. हा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 50 SMSसह येतो. Jio च्या या रिचार्जसोबत, वापरकर्त्यांना JioTV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
BSNLचा 100 रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन 87 रुपयांचा आहे. एकूण 14 दिवसांच्या वैधतेसह BSNL प्रीपेड योजना ऑफर करते. 87 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा येतो म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 14GB डेटा मिळेल. डेटा संपल्यानंतर, स्पीड 40 Kbps पर्यंत कमी होईल. याशिवाय वापरकर्त्यांना दररोज 100 SMS आणि मोफत अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील मिळेल.
Airtelचा 100 रुपयांपेक्षा कमी प्लॅन 99 रुपयांचा आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये बहुतेक 200MB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1 पैसे प्रति सेकंद दराने कॉल चार्ज द्यावा लागेल. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. मात्र, यामध्ये SMSबाबत कोणताही बेनिफिट देण्यात आलेला नाही. परंतु, तुम्हाला लोकल SMS 1 रुपये प्रति SMS आणि STD SMS 1.5 रुपयांमध्ये पाठवता येईल.