Airtel IPTV Service: हाय-स्पीड डेटासह OTT ची मज्जा पूर्णपणे Free, जाणून घ्या किंमत

Updated on 27-Mar-2025
HIGHLIGHTS

Airtel ची IPTV म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सर्व्हिस नुकतेच सुरु झाली.

या सर्व्हिसअंतर्गत वापरकर्त्यांना 29 OTT ऍप्सचा ऍक्सेस मिळेल.

या सर्व्हिससह लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि हाय स्पीड डेटा देखील प्रदान केला जाईल.

Airtel IPTV Service: Airtel ची IPTV म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सर्व्हिस नुकतेच सुरु झाली आहे. ही सर्व्हिस देशातील 2000 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत, वापरकर्त्यांना 29 OTT ऍप्सचा ऍक्सेस मिळेल. या सर्व्हिससह युजर्स कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता त्यांचे आवडते चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यास सक्षम असतील.

विशेष म्हणजे या सर्व्हिसमध्ये प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix, प्राइम व्हिडिओ आणि Zee5 सारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. एवढेच नाही तर, यात लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि हाय स्पीड डेटा देखील प्रदान केला जाईल. जाणून घेऊयात सविस्तर-

Airtel IPTV Service

Airtel IPTV सर्व्हिसची सुरुवातीची किंमत 699 रुपये इतकी आहे. त्याबरोबरच, या सर्व्हीसचा हाय-एंड प्लॅनची किंमत 3,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सर्व प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी 1Gbps स्पीडसह डेटा दिला जात आहे. मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime सारख्या तब्बल 29 OTT चे सबस्क्रिप्शन मिळेल. एवढेच नाही तर, यासह 350 लाईव्ह टीव्ही चॅनेलचा मोफत ऍक्सेस देखील मिळेल.

airtel iptv services airtel iptv services

Airtel IPTV Service वरील ऑफर्स

या इंट्रोडक्ट्री ऑफरअंतर्गत IPTV प्लॅन खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांना तब्बल 30 दिवसांसाठी ही सेवा मोफत मिळणार आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, Airtel थँक्स ऍपवर जाऊन ते वापरता येते. ही सर्व्हिस मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये काही निवडक सर्कल्समध्ये लाईव्ह करण्यात आली होती.

Airtel चे नवे प्लॅन्स

Airtel ने अलिकडेच नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. त्यामध्ये या यावर्षी नव्याने लाँच झालेले प्लॅन्स समाविष्ट आहेत. या दोन्ही प्लॅनची ​​किंमत 1,849 रुपये आणि 460 रुपये इतकी आहे. तसेच, या दोन्ही प्लॅनमध्ये इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी अमर्यादित कॉलिंग देखील दिले जाते. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये 3600 पर्यंत मोफत SMS मिळतात. मात्र, दोन्ही प्लॅन्सची वैधता वेगळी आहे. 1849 रुपयांच्या पॅकची वैधता 365 दिवसांची आहे, तर 469 रुपयांच्या पॅकची वैधता 84 दिवसांची आहे. मात्र, या दोन्ही प्लॅनमध्ये डेटा उपलब्ध नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :