Airtel IPTV Entertainment: सिनेरसिकांसाठी नवीन सर्व्हिस सुरु! या प्लॅन्समध्ये मिळेल डिजिटल TV सुविधा

Airtel IPTV Entertainment: सिनेरसिकांसाठी नवीन सर्व्हिस सुरु! या प्लॅन्समध्ये मिळेल डिजिटल TV सुविधा
HIGHLIGHTS

Airtel ची भारतात IPTV म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सर्व्हिस सुरू

या सिरीजमध्ये तुम्हाला हाय कॉलिटीच्या डिजिटल कंटेंटचा ऍक्सेस मिळणार आहे.

Airtel Black IPTV Entertainment ची सुरुवातीची किंमत 699 रुपये आहे.

Airtel IPTV Entertainment: प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज Airtel ने भारतात त्यांची IPTV म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सर्व्हिस सुरू केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने ही सेवा Airtel Black प्लॅन अंतर्गत दिली आहे, जी सध्या फक्त काही सर्कलमध्ये उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, एअरटेल ब्लॅक ही कंपनीची प्रीमियम पोस्टपेड सेवा आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना मोबाइल, डिजिटल टीव्ही आणि फायबर सेवा दिली जाते.

Also Read: Upcoming Mobile Phones This Week: या आठवड्यात भारतात लाँच होणार Vivo, Realme चे भारी स्मार्टफोन्स

आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनची ​​किंमत 699 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय, प्रीमियम प्लॅनची ​​किंमत 3,999 रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊयात Airtel IPTV Entertainment सर्व्हिसबद्दल अधिक तपशील-

airtel iptv entertainment service launched

काय आहे Airtel IPTV एंटरटेनमेंट सर्व्हिस?

Airtel कंपनीने भारतात IPTV सर्व्हिस सुरू केली आहे. यामध्ये तुम्हाला हाय कॉलिटीच्या डिजिटल कंटेंटचा ऍक्सेस मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, IPTV ही एक प्रकारची डिजिटल टीव्ही प्रसारण टेक्नॉलॉजी आहे. जी केबल, उपग्रह किंवा ओव्हर-द-एअर सिग्नलशिवाय इंटरनेटद्वारे टीव्ही कंटेंट वितरित करते. वापरकर्ते फक्त इंटरनेट कनेक्शनद्वारे टीव्ही चॅनेल आणि डिमांडनुसार व्हिडिओ स्ट्रीम करण्यास सक्षम असतील.

Airtel Black IPTV Entertainment प्लॅन्स

  • Airtel Black IPTV Entertainment ची सुरुवातीची किंमत 699 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 40Mbps स्पीडसह अमर्यादित इंटरनेट ऍक्सेस मिळतो. या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चे फायदे आहेत. यासह तुम्हाला डिजिटल टीव्हीचा ऍक्सेस मिळेल.
  • यातील दुसऱ्या प्लॅनची ​​किंमत 899 रुपये आहे, जी 100Mbps वेगाने इंटरनेट सुविधा देते. या प्लॅन्समध्ये वरील प्लॅन्सचे फायदे मिळतील.
  • तसेच 1,099 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 200Mbps चा स्पीड मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये वरील इतर बेनिफिट्स देखील मिळणार आहेत.
Airtel IPTV Entertainment
  • 1559 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300Mbps स्पीडसह इंटरनेट कनेक्शन मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला Prime Video आणि Disney+ Hotstar चा ऍक्सेस मिळतो.
  • 3,999 रुपयांचा प्लॅन 1024Mbps इंटरनेट स्पीड देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला Prime Video आणि Disney+ Hotstar चा ऍक्सेस देखील मिळतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना IPTV सेवेसह फायबर, लँडलाइन आणि OTT बेनिफिट्स देखील मिळतील.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo