नुकताच टेलीकॉम ऑपरेटर एयरटेल ने एक भरपूर खास आणि शानदार प्लान आपल्या यूजर्स साठी सादर केला आहे. कंपनी ने आपल्या यूजर्स साठी 70 रुपयांचा नवीन प्लान आणला आहे ज्यात यूजर्स साठी भरपूर काही आहे.
महत्वाचे मुद्दे:
जियोला टक्कर देईल एयरटेलचा हा प्लान
70 रुपयांमध्ये मिळवा एयरटेलच्या सर्व सर्विस
जर तुम्ही एयरटेल यूजर असाल तर तुमच्यासाठी हि खूप खास आणि मोठी बातमी ठरू शकते, खासकरून त्या यूजर्स साठी ज्यांना कमी किंमतीत सर्वकाही हवे आहे. भारतातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनी एयरटेल ने अलीकडेच आपल्या यूजर्स साठी एक नवीन प्लान सादर केला आहे. कंपनी 70 रुपयांचा नवीन प्लान घेऊन आली आहे आणि यूजर्स साठी हा प्लान खूप खास आणि फायदेशीर असेल.
एयरटेलच्या या नवीन रिचार्ज प्लान नुसार तुम्ही त्यांच्या 70 रुपयांच्या प्लानने रिचार्ज केल्यास तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल. त्याचबरोबर 100MB 2G/3G/4G डेटा पण यात दिला जात आहे. सोबतच तुम्हाला कॉलिंगची सुविधा पण दिली जात आहे. पण यूजर्स साठी या प्लान बद्दल एक खास बाब अशी कि एयरटेल ने हा प्लान आपल्या सर्व यूजर्स साठी आणला नाही तर नवीन यूजर्स साठी हा प्लान उपलब्ध आहे.
हा प्लान त्या यूजर्स साठी आहे जे एयरटेलचे नवीन ग्राहक बनतील. त्यामुळे जे नवीन यूजर्स एयरटेल वापरू इच्छित आहेत, ते या प्लानचा फायदा घेऊ शकतात. कंपनी ने अशाप्रकारचा प्लान आपल्या यूजर्सची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी आणला आहे. त्यामुळे हा एयरटेलचा नवीन आणि आकर्षक प्लान Jio ला चांगलीच टक्कर देऊ शकतो.