हा प्लॅन आता युजर्सना संपूर्ण महिना वापरता येणार आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळेल.
AIRTELने आपल्या एका रिचार्ज प्लॅनची वैधता वाढवली आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 359 रुपये आहे. पूर्वी या प्लॅनची वैधता फक्त 28 दिवसांची होती. मात्र, आता हा प्लॅन तुम्हाला संपूर्ण महिना वापरता येणार आहे. वैधता वाढवूनही कंपनीने कोणत्याही प्रकारे फायदे कमी केलेले नाहीत.
एअरटेलच्या 359 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना पूर्ण महिन्याची वैधता मिळेल. याशिवाय संपूर्ण पॅक दरम्यान एकूण 60GB इंटरनेट डेटा दिला जाईल, असे वृत्त मिळाले आहे.
AIRTE च्या 359 रुपयांचे बेनिफिट्स
एअरटेलच्या 359 रुपयांच्या प्लॅनच्या फायद्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये फक्त वैधता बदलण्यात आली आहे. एअरटेलच्या 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना पूर्ण 1 महिन्याची वैधता मिळेल. दरम्यान, यूजर्स अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि इतर फीचर्सचा लाभ घेऊ शकतील.
लोकल आणि STD कॉलिंगचा लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच, यूजर्सना एकूण 60GB इंटरनेट डेटा मिळेल. मात्र, जर 31 दिवसांचा महिना असेल, तर वापरकर्त्यांना 62GB इंटरनेट डेटा मिळेल.
या प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदे म्हणून Xstream ऍप, Apollo 24×7, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध असेल. याशिवाय विंक म्युझिक मोफत उपलब्ध असेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.