Airtel च्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीचे MD गोपाल विट्टल यांनी एका नवीन पद्धतीची वापरकर्त्यांना ओळख करून दिली आहे. या नवीन पद्धतीद्वारे किंवा फिचरच्या मदतीने ते त्यांचा हरवलेला स्मार्टफोन सहज ट्रॅक करून शोधून काढू शकतात. यासाठी त्यांना विशेष काहीही करण्याची गरज नाही. मग नक्की हे शक्य तरी कसे? चला सविस्तर जाणून घ्या.
हे सुद्धा वाचा: Price Leak! 8GB रॅमसह Realme C65 5G स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये?
वास्तविक, Airtel चे MD गोपाल विठ्ठल E-SIM च्या बेनिफिट्सबद्दल सांगत होते. या ई-सिमद्वारे हरवलेले सिमकार्ड सहज परत मिळवता येईल. पुढे गोपाल विट्टल म्हणाले की, चोरीला गेलेला स्मार्टफोन ट्रॅक करण्यासाठी ई-सिम देखील खूप उपयुक्त ठरू शकते. कारण ई-सिम काढणे सोपे नाही.
यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, या ई-सिममुळे तुमच्या स्मार्टफोनचा मागोवा घेणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल. यासोबतच तुमचा हरवलेला स्मार्टफोन सापडण्याची शक्यताही दुपटीने वाढते. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचा हरवलेला किंवा चोरी गेलेला फोन परत मिळण्यास मदत होईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात अजूनही जवळपास सर्व नागरिक फिजिकल सिमचा वापर करतात. पण ई-सिमच्या वाढत्या ट्रेंडमुळे लवकरात लवकर ही पद्धत सर्व भारतीय ग्राहक वापरण्यास सुरुवात करतील, अशी अपेक्षा आहे.