Airtel आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत असते. डेली डेटापासून ते टॉकटाइमपर्यंत वापरकर्त्यांसाठी विविध श्रेणींमध्ये प्लॅन्स उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही घरून काम करत असाल आणि तुम्हाला अधिक डेटाची गरज असेल तर, यासाठी देखील कंपनीने काही प्लॅन्स लाँच केले आहेत. दैनंदिन डेटा व्यतिरिक्त Airtel असे अनेक प्लॅन्स ऑफर करते, ज्यामध्ये 60GB पर्यंत डेटा उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला Airtel च्या अशाच काही डेटा प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.
हे सुद्धा वाचा: Jio ने लाँच केला दीर्घकालीन प्लॅन! हाय-स्पीड डेटासह Amazon Prime Video सबस्क्रिप्शन उपलब्ध
कंपनीच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी 50GB पर्यंत मोबाइल डेटा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 300 मोफत SMS देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, प्लॅनमध्ये हेलोट्यून आणि विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. यासह तुम्ही मानसोक्त गाणी ऐकू शकता.
वरील प्लॅनप्रमाणे 509 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये देखील भरपूर डेटा म्हणजे 60GB डेटा मिळणार आहे. हा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. डेटा व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगसह मोफत 300 SMS देखील ऑफर करते.
Airtel 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB डेटा ऑफर करते. वरील प्लॅनप्रमाणे यात अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध नाही. मात्र, या प्लॅनची वैधता तुमच्या सध्याच्या म्हणजेच ऍक्टिव्ह बेस प्लॅनच्या वैधतेपर्यंत राहील.
हा प्लॅन Airtelच्या 25GB डेटासह एक प्लॅन ऑफर करतो. 296 रुपयांमध्ये 25GB मोबाइल डेटा आणि 100 मोफत SMS दररोज मिळतील. या प्लॅनची वैधता पूर्ण 30 दिवस म्हणजेच एका महिन्याची असणार आहे.
दररोज अधिक डेटाची गरज असेल तर तुम्ही 3GB दैनिक डेटासह येणारे प्लॅन्सदेखील घेऊ शकता. होय, Airtel 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3GB डेली डेटा ऑफर करते. तसेच, डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री SMS सारखे बेनिफिट्स देखील मिळतात. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.