सध्या Bharti Airtel आपल्या प्रीपेड सब्सक्राइबर्स साठी पाच डेटा ऍड-ऑन पॅक्स ऑफर करत आहे ज्यांची किंमत Rs 28, Rs 48, Rs 92, Rs 98 आणि Rs 175 आहे. याआधी कंपनी एकूण चार डाटा-ऑन पॅक्स ऑफर करत होती जे आता वाढून पाच झाले आहेत. Rs 98 आणि Rs 175 च्या पॅक्स मध्ये मोठा फरक आहे. Rs 98 च्या पॅक मध्ये 28 दिवसांसाठी 6GB डेटा मिळतो तसेच Rs 175 च्या प्लान मध्ये पण समान 6GB डेटा बेनिफिट मिळतो.
Airtel च्या सर्वात स्वस्त डेटा ऍड-ऑन पॅक बद्दल बोलायचे तर हा Rs 28 मध्ये येतो आणि या पॅक मध्ये फक्त डेटा मिळतो. या प्लान मध्ये सब्सक्राइबर्सना 500MB डेटा मिळतो ज्याची वैधता 28 दिवस आहे. हा प्लान त्या यूजर्स साठी बेस्ट आहे जे फीचर फोन वापरतात किंवा मोबाईल डेटा वापरताच नाहीत.
एयरटेलच्या Rs 48 च्या प्रीपेड डेटा पॅक मध्ये यूजर्सना एकूण 3GB डेटा मिळतो आणि या प्लानची वैधता पण 28 दिवस आहे. जे यूजर महिन्यातून थोडंफार मोबाईल डेटा वापरतात ते हा पॅक ऍक्टिव्हेट करू शकतात.
Rs 92 च्या डेटा प्रीपेड पॅक मध्ये यूजर्सना एकूण 6GB डेटा मिळतो आणि या प्लानची वैधता 7 दिवस आहे. या प्लानचा वापर यूजर्स आपली रोजची डेटा लिमिट संपल्यावर करू शकतात. 6GB डेटा लिमिट विडियो, सोशल मीडिया इत्यादी साठी योग्य आहे.
डेटा पॅकची लिस्ट मध्ये एयरटेलचा हा प्लान पण 6GB डेटा ऑफर करतो पण या प्लानची वैधता 28 दिवस आहे. ता डेटा पॅक मध्ये यूजर्सना 28 दिवसांसाठी 10 SMS मिळतात. यूजर्स आपली डेली डेटा लिमिट संपल्यावर या प्लानचा वापर करू शकतात.
इट बातम्यांमध्ये समोर आले आहे कि एयरटेलचा Rs 175 मध्ये आलेल्या नवीन डेटा ऍड ऑन पॅक पण समान 6GB डेटा त्याच 28 दिवसांच्या वैधतेसाठी साठी ऑफर करत आहे. एयरटेलच्या Rs 98 आणि Rs 175 मध्ये येणारे दोन्ही प्लान समान लाभ ऑफर करतात आणि दोघांची वैधता पण समान आहे.