5G सर्व्हिस लाँच झाल्यापासून देशातील सर्वात मोठे टेलिकॉम दिग्गज JIO आणि AIRTEL त्यांच्या युजर्सना 5G डेटा ऑफर करतात. मात्र, आता भारती Airtel ने देशात 5G च्या वापरबाबत काही अटी व शर्ती स्पष्ट केल्या आहेत. टेलिकॉम कंपन्या Jio आणि Airtel यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने त्यांचे 5G अमर्यादित सेवा धोरण स्पष्टपणे परिभाषित करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर Airtel ने आपल्या 5G अमर्यादित सेवेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. वापरकर्त्यांना 5G अमर्यादित डेटा मोफत लाभ म्हणून दिला जातो, पण त्यातही काही अटी आहेत, असे कंपनीने सांगितले. Airtel ने 5G अमर्यादित धोरणाबाबत सांगितले की, ही सेवा केवळ वैयक्तिक वापरासाठी आणि गैर-व्यावसायिक वापरासाठी आहे. ज्यासाठी कंपनी दरमहा 300GB पर्यंत डेटा मर्यादा सेट करते. जर एखादी व्यक्ती याहून अधिक डेटा वापरत असेल तर तो व्यावसायिक वापर म्हणून गणला जाईल.
Vodafone Idea ने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे म्हणजेच TRAI कडे तक्रार करून भारतातील टेलिकॉम कंपन्यानी म्हणजेच Jio आणि Airtel ने त्यांच्या 5G सेवेची किंमत निश्चित करावी अशी मागणी केली होती. TRAI च्या सूचनेनुसार, Airtel ने आपल्या 5G पॉलिसीबाबत हे अपडेट जारी केले आहे.
दरम्यान, Airtel ने अधिकृत विधान जारी करून, कंपनीने आपल्या वेबसाइटवर धोरण स्पष्ट केले आहे. त्यानुसार, “अनलिमिटेड 5G डेटा Airtel वापरकर्त्यांसाठी एक प्रास्ताविक ऑफर आहे. ज्या अंतर्गत वापरकर्ते 5G एक्सपेरियन्स करू शकतात. ज्या वापरकर्त्यांकडे 5G सक्षम उपकरणे आहेत आणि ते Airtel 5G Plus नेटवर्कशी जोडलेले आहेत, ते युजर्स अमर्यादित 5G सेवा घेऊ शकतात.”
अमर्यादित 5G डेटा ऑफर करणार्या Airtel प्लॅनची किंमत 239 रुपयांपासून सुरू होते. या वरील सर्व प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहक अमर्यादित 5G सेवेसाठी दावा करू शकतात, असे सांगितले आहेत. त्यानंतर, युजर्स या सेवेचा अनुभव घेऊ शकतात.