Airtel चा वार्षिक रिचार्ज प्लॅन आहे Jio पेक्षा स्वस्त, मिळतात अप्रतिम बेनिफिट

Updated on 15-May-2023
HIGHLIGHTS

Airtel चा 1799 रुपयांचा प्लॅन

यामध्ये डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि SMS देखील आहेत.

हा प्लॅन JIO च्या वार्षिक प्लॅनपेक्षा स्वस्त आहे.

टेलिकॉम विश्वातील दिग्गज कंपनी Airtel आणि Jio मध्ये युजर्सला आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. दोन्ही कंपन्या नवीन रिचार्ज प्लॅन देखील ऑफर करत आहेत. या प्लॅन्समध्ये एका वर्षासाठी अमर्यादित कॉलिंग आणि एका महिन्यासाठी डेटासह प्लॅन्सचा समावेश आहे. अलीकडेच, Airtel ने देखील असाच एक प्लान सादर केला आहे. बघुयात सविस्तर तपशील –  

Airtel चा 1799 रुपयांचा प्लॅन

यामध्ये यूजर्सना 365 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लॅनमध्ये दीर्घ वैधता, डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह इतर फायदेही मिळतात. जसे की, अपोलो 24/7 सर्कल, विंक म्युझिक ॲपची मोफत सदस्यता आणि मोफत हॅलो ट्यून उपलब्ध आहेत. 

प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 24GB डेटा मिळतो. तुम्हाला रोजच्या डेटाचे टेन्शन राहणार नाही. डेटा संपल्यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये डेटा ऍड ऑन प्लॅन रिचार्ज देखील घेऊ शकता. या प्लॅनमध्ये दररोज 100SMS मिळतात. म्हणजेच तुम्हाला वर्षभरासाठी एकूण 3600 मॅसेजची सुविधा मिळेल.

Jio चा वार्षिक प्लॅन

Airtel च्या तुलनेत Jio च्या सर्वात कमी किमतीच्या वार्षिक प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास त्याची किंमत 2,879 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. यासोबत, Jio ॲप्सचे ॲक्सेस देखील आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :